Take a fresh look at your lifestyle.

राखी सावंत को सब पता है..! ‘खतरों के खिलाडी ११’ शो सुरु होण्याआधीच विजेत्याचे नाव केले जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय आव्हानात्मक शो ‘खतरों के खिलाडी’चा ११ वा नवा कोरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये सहभागी होणारे सगळे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनला पोहोचले आहेत. तसे तर हा शो बऱ्याचदा देशाबाहेरच चित्रित केला जातो. मात्र यंदा कोरोनाचे कारण म्हणून स्पर्धकांना दक्षिण आफ्रिकेला नेऊन शो पुर्ण करण्याचा घाट घातला आहे. पण नुकताच या शोबाबत एक मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. हा खुलासा ड्रामा क्वीन राखी सावंतने केला आहे. हा शो सुरु होण्याआधीच विजेता कोण होणार, हे निर्मात्यांनी आधीच ठरवले असल्याचा शॉकिंग दावा राखीने केला आहे. या विजेत्याचे नावही राखीने लगेच जाहिर केले आहे.

‘खतरों के खिलाडी ११’च्या सर्व स्पर्धकांची यादी अद्याप समोर आलेली नाही. पण अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, निक्की तंबोली, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, वरूण सूद यांच्या नावांचा खुलासा मात्र झाला आहे. नुकतेच केपटाउनकडे रवाना होतानाचे यांचे व्हिडीओ आणि फोटोस सेलिब्रटी फोटोग्राफरच्या माध्यमातून समोर आले आहेत. आता साहजिकच हा शो सुरु होणार म्हणजे यापैकी कोण विजेता असेल? या बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण असणार. पण राखीने हा शो सुरु होण्याआधीच विजेत्याचे नाव सांगून पूर्ण शोची बत्ती गुल्ल केली आहे. ती म्हणतेय कि हा शो अभिनव शुक्ला जिंकणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण हेच खर आहे.

नुकतेच राखीला मीडिया फोटोग्राफर्सकडून ‘खतरों के खिलाडी’बद्दल विचारले होते. त्याबाबत राखीने थेट विजेता कोण असणार याबाबत भाकीतच केले. तिच्या मते, हा शो अभिनव शुक्लाच जिंकणार आहे. ‘बिग बॉस सीझन १४ मध्ये अभिनवने अनेक कठीण टास्क अगदी सहजपणे पूर्ण केले होते. तो खूप स्ट्राँग आहे. आकर्षक आहे आणि पट्टीचा राजकारणी देखील आहे. त्यामुळे तो कायम चर्चेत असतो अन् चर्चेत राहणारे स्पर्धकच जिंकतात. त्यामुळे अभिनव शुक्लाच जिंकेल,’ असे ती म्हणाली.

तर राहुल वैद्यबद्दल बोलताना राखीने त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये का गेला, माहित नाही. आधीच त्याला पाठीचा त्रास आहे. अशात तो सुखरूप परत यावा, इतकीच प्रार्थना मी करते, असे ती म्हणाली.