Take a fresh look at your lifestyle.

राखी सावंतच्या मदतीला धावला भाईजान ; कॅन्सरग्रस्त आईने मानले आभार

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिने तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सवर उपचार घेत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी राखीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे म्हटले होते. आता राखीने व्हिडीओ शेअर करत सलमान खानचे आभारा मानले आहेत.

राखीने आईचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्या सलमान व सोहैल खान यांचे आभार मानताना दिसत आहेत. “माझी किमोथेरेपी सुरू आहे. चार किमो झाले असून दोन बाकी आहेत. सलमान व सोहैल तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि तुम्ही सुखी-समाधानी राहा”, असा आशीर्वाद त्या देत आहेत.

राखीची आई संध्या मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये असून त्या कॅन्सरवर उपचार घेत आहेत. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले होते. एका चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती असे म्हणत कमेंट केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.