Take a fresh look at your lifestyle.

BB15 – शो’च्या उतरत्या TRP’साठी राखी ठरणार तारणहार?; लवकरच पती रितेशसोबत दमदार एंट्री घेणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या विकेंड वारमध्ये ‘बिग बॉस १५ च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून ‘बिग बॉस १३ च्या माजी स्पर्धक रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि ‘बिग बॉस मराठी २ चे माजी स्पर्धक अभिजित बिचुकले दमदार एन्ट्री घेणार होते. खरतर या वाईल्ड कार्ड एंट्री मेकर्सचा TRP वाढविण्याचा फंडा होता. पण झाले असे कि नेमके ऐनवेळी अभिजित बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आणि त्यांची एन्ट्रीच रद्द झाली. इतकेच नव्हे तर त्यांच्यासह एंट्री घेणाऱ्या रश्मी आणि देवोलिनाची एंट्री लांबली. त्यामुळे मेकर्सची चिंता वाढली. आता शो चा TRP आणखी ढासळण्याआधी त्याला कोण वाचवणार? आणि यामुळे ड्रामाक्वीन राखी सावंतच्या नावाची चर्चा सुरु झाली. यानंतर आता राखीनेच स्वतः एका प्रोमोशन ती तिच्या पतीसोबत येणार असल्याचे सांगितले आहे.

अभिजीत बिचुकले यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री ऐनवेळी रद्द झाल्यामूळे मेकर्सचा TRP वाढविण्याचा फंडा लॉस जातो का काय? असेच वाटू लागले असताना अचानक राखी सावंत ‘बिग बॉस साठी तारणहार होऊन अवतरली आहे असेच भासू लागले आहे. कारण आता बिचुकलेंची जागा ड्रामा क्वीन राखी सावंत घेणार आहे हे स्पष्ट झाले आहे. तिने स्वतःचा आता बिग बॉस १५च्या घरात एन्ट्री घेणार असल्याची खबर दिली आहे. अद्याप याबाबतची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण राखी सावंतने एक पोस्ट शेअर करत याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याशिवाय बिग बॉस ओटीटीची स्पर्धक उर्फी जावेद हिनेही राखीची एन्ट्री होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. तिने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यात राखी सावंत बिग बॉसमध्ये वाइर्ल्ड कार्ड एन्ट्री करतेय, आता मजा येणार, असं तिने लिहिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस १५ चा टीआरपी म्हणावा तसा दिसत नाही. अगदी यादीची १४ सीजन जितके गाजले त्या लेव्हलपर्यंतसुद्धा अजूनही ‘बिग बॉसचा १५ वा सीजन काही आलेला नाही. बघता बघता सीजन संपायला आला पण त्याचा प्रेक्षक काही केल्या वाढेना. म्हणून आता मेकर्स रोज नवे तिगडंम लावताना दिसत आहेत. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून आता राखी एंट्री करणार हे कळल्यानंतर तिचा चाहता वर्ग तर खुश झालाच आहे. शिवाय मेकर्सच्याही जिवंत जीव आला असेल यात काही शंका नाही. त्यामुळे आता ‘बिग बॉस १५ चा TRP वाढतो का पडतो? हे पाहायला मजा येणार हे नक्की.