हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत कधी? कुठे? आणि काय करेल? याचा कुणीही कसाही अंदाज किंवा नेम लावू शकेल असे अद्याप तरी घडलेले नाही. कारण ती जे काही करते ते एकतर अतरंगी असते नाहीतर डोक्यावरून जाईल असे. असेच झालेय आतासुद्धा. होय. नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारी राखी सध्या तीच्या एका व्हिडीओ पोस्टमुळे चर्चेत आहे. अलीकडेच बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत असं काही बरळली कि तिच्या एक एक शब्दामुळे राखीला जबर मानसिक धक्का बसला आहे. हा धक्का इतका जबर होता की, तिला थेट रूग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राखीला नर्स तपासताना दिसतेय. शिवाय राखी हॉस्पिटलच्या बेडवर झोपल्याचे दिसत आहे. दरम्यान राखी या व्हिडिओत म्हणते कि, मी आजारी आहे. हॉस्पिटलमध्ये आहे. मला जबर मानसिक धक्का बसला आहे. कारण अलीकडेच पद्मश्री मिळलेल्या अभिनेत्रीने म्हटले आहे कि, आपल्याला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे. काय तुम्ही तुमच्या देशावर प्रेम करत नाही. मला माहित आहे तुम्ही करता. मीपण करते. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, जवानांनी कारगिल युद्ध जिंकले स्वतःचे बलिदान दिले हे सर्व व्यर्थ आहे का? आज त्या जवानांच्या निकटवर्तीयांना, कुटुंबियातील लोकांना किती दुःख होत असेल जेव्हा ते हे असं ऐकतात कि आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य भिकेत मिळालं आणि २०१४ मध्ये आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो.
पुढे, माझी इच्छा आहे जे लोक आपल्या देशावर, जवानांवर प्रेम करतात त्यांनी अश्या लोकांना प्रत्युत्तर द्यावं. बाहेरच्या देशातील लोक या टिप्पणीमुळे आपल्यावर हसत असतील. म्हणत असतील कि याच देशाची नागरिक असं बोलतेय. मला तर वाटत कि हि मुलगी.. हि कंगना आपल्या देशाची नागरिक नाहीच आहे. दुसऱ्या देशाची रॉ एजंट आहे जी आपल्या देशात येऊन आपल्या देशात राहून आपल्याच देशाबद्दल वाट्टेल ते बोलतेय. भारतात राहता. भारतात कमावता आणि भारताला शिव्या देता. लाज वाटली पाहिजे तुला कंगना. तुला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. कारण हे वक्तव्य अतिशय चुकीचं आणि खेदजन्य आहे. जय हिंद! जय भारत! भारत माता कि जय!