Take a fresh look at your lifestyle.

म्हातारी झालीस तरी सेक्सीच दिसशील; राखी सावंतच्या ओल्ड लूकवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे भारी चर्चेत असते. तीन नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी सरप्राईज करणारे ड्रामे करताना दिसतात. आता तर चक्क तिने स्वतःचा ओल्ड लूक शेअर केला आहे. तुम्ही पाहाल तर तुम्हीही OMG म्हणाल. राखीचा हा नवा लूक पाहून तिचे चाहते अगदीच आश्चर्यचकित झाले आहेत. कारण पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा आणि राखी सावंत? हे समीकरण जरा न जुळणारेच वाटते नाही का? त्यात राखीने तिचा हा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की राखी कशी काय म्हतारी होऊ शकते. यानिमित्त तिच्या चाहत्यांनी देखील अश्या काही कमेंट्स केल्या आहेत कि बस्स.

राखीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राखीचे केस पांढरे दिसत आहेत, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला आहे आणि डोळ्याला चष्मा तसेच गळ्याला पट्टा दिसत आहे. या फोटोत राखी म्हातारी दिसत आहे. राखीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रंचंड व्हायरल होत आहेत. मुख्य म्हणजे हे पोट शेअर करताना राखीने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ही कोण आहे ओळखले का ? तर राखीच्या या फोटोवर जसलीन मथारूने कमेंट केली कि, तू जरी म्हातारी झालीस तरी सेक्सीच दिसशील.

राखीने दुसऱ्या पोस्टमध्ये मेकअपचा वापर करून लुक कसा बदलला हे दाखवले आहे.तर या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते कि, रोहित भाई मला सोनी सब वाहिनीवरील बेगम बादशाह या मालिकेत एका ८० वर्षाच्या महिलेची भूमिका साकरण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. राखीच्या या लुकवर अनेक सेलेब्स आणि चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी या लूकचे प्रचंड कौतुक केले आहे. खूप भारी, वेगळीच दिसतेय, कुल राखी अश्या प्रकारच्या कमेंट्स या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.