Take a fresh look at your lifestyle.

‘कंगनाजी देशाची थोडी सेवा करा ना’ म्हणत राखीने घेतला पंगा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि राखी सावंत या दोघीही अश्या सेलेब्रिटी आहेत ज्या कोणत्याही विषयावर आपले मत व्यक्त करताना जराही घाबरत नाहीत. उलट थेट विषयाला हात घालून परखडपणे बोलून मोकळ्या होतात. नुकतीच राखी तब्बल ४ दिवसानंतर सेलिब्रिटी मीडियाच्या कॅमेरात दिसली. यावेळी राखीने कंगनासाठी एक संदेश दिला आहे. तिने कंगनाला देशाची सेवा करीत ऑक्सिजन सिलेंडर दान करण्यास सांगितले आहे.

राखी सावंत आपल्या वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे वारंवार चर्चेत असते.नुकतीच राखी एका ठिकाणी स्पॉट झाली असता मीडिया फोटोग्राफेर्सने तिला कंगना व्यक्त होत असलेल्या मुद्द्यांबाबत तिचे काय म्हणणे आहे अशी विचारणा केली. फोटोग्राफेर्सने विचारले कि, ‘कंगनाजी सतत असे म्हणत आहेत की, आजकाल देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बर्‍याच ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही, आपल्यासाठी, देशासाठी, कंगनाजींच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर राखी म्हणाली, ‘कंगना जी, देशाची थोडी सेवा करा ना. तुमच्याकडे करोडो रुपये आहेत. त्यातून ऑक्सिजन खरेदी करा आणि लोकांमध्ये वितरित करा, आम्ही पण तर हेच करत आहोत.’

या व्हिडिओत राखीच्या चेह-यावर दोन दोन मास्क आणि दोन्ही हातात सॅनिटायझरची बॉटल घेऊन ती कारमधून उतरताना दिसतेय. बाहेर येताच चारही बाजूंनी सॅनिटायजर फवारताना देखील दिसतेय. देखो, तुमलोग कोरोना को पालो मत, उसको जवान मत होने दो, वो अभी बच्चा आहे, असे काय काय बोलत शेवटी कंगनावर येते. नेहमीप्रमाणेच भन्नाट वायरल होऊ लागला आहे. आता हा व्हिडीओ कंगनापर्यंत पोहोचल्यानंतर ती किती मान्य करतेय आणि किती पंगा घेतेय हे पाहणे उत्सुकतेचे आहे.