Take a fresh look at your lifestyle.

रक्षाबंधन 2021 – दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या बहिणीने शेअर केली भावनिक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने स्वतःच्या हिंमतीवर आणि कोणताही बॅकग्राउंड नसताना एक वेगळी ओळख तयार केली होती. सिनेसृष्टीत त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने आघाडीच्या कित्येक कलाकारांना मागे सारले होते. त्यामुळे त्याचा एक वेगळा असा मोठा चाहता वर्ग संपूर्ण देशभरात आहे. परंतु एक काळ असा आला आणि त्यात सुशांत निघून गेला. चाहत्यांच्या डोळ्यात पाणी देऊन सुशांतने संपूर्ण जगाला १४ जून २०२० रोजी कायमचा निरोप दिला. त्याचे निधन हि बाब अतिशय जिव्हारी लागणारी होती किंबहुना आहे. इतकेच काय तर आजही त्याच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात साठलेल्या आहेत आणि जिवंत आहेत. आपल्या चाहत्यांसह संपूर्ण कुटुंबाला एक मोठा धक्का देत सुशांतने जग सोडले मात्र आठवणी ज्या होत्या त्या आजतागायत जीवित राहिल्या आहेत. त्यात राखीपोर्णीमेचा सण आहे आणि हा सण भावाबहिणीच्या अतूट नात्याचे दर्शन घडवितो. अशावेळी साहजिकच सुशांतच्या बहिणींनाही आपल्या भावाची आठवण येणे स्वाभाविक आहे.

सध्या सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे अनेकदा सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जातो. त्याच्या बहिणीही रोज त्याच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसतात आणि रक्षाबंधन असताना अशा प्रसंगी भावाची आठवण कोणत्या बहिणीला येत नाही. त्यामुळे सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाची आठवण काढत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. श्वेता सिंग कीर्तीने भाऊ सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांतसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसह श्वेताने ‘लव्ह यू भाई, आम्ही नेहमी सोबत राहू’ असे कॅप्शन लिहिले आहे. ही पोस्ट पाहून सुशांतचे चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत. एक निमित्त पुरेसे असते कुणाची आठवण येण्यासाठी आणि सुशांतची आठवण येत नाही असा एकही दिवस त्याच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी सरत नाही. दरम्यान या पोस्टवर सुशांतच्या एका चाहत्याने ‘सुशांत आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील’ असे लिहिले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच ‘छिछोरे’ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांद्वारे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.