Take a fresh look at your lifestyle.

‘दिल्ली जमात २०२०’ शॉर्टफिल्म तर ‘कुंभमेळा २०२१’ बाहुबलीयन चित्रपट; कुंभमेळ्यातील गर्दी पाहून रामगोपाल वर्मांचा संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात नुकतेच दुसरे शाही स्नान पार पडले. या शाही स्नानासाठी अनेक साधू-संत आले होते. कोरोनाचा संसर्ग रोखता यावा म्हणून केलेल्या नियमांना अक्षरशः कुंभस्नानात बुडवून काढल्याचे दिसत आहे. यामुळे अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. येथे ना कोणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले, ना कुणी मास्क लावल्याचे दिसत आहे. या मेळ्यासाठी जमलेल्या भाविकांची गर्दी पाहून दिग्दर्शक राम गोपाल वर्मांना त्यांचा संताप अनावर झाल्याने, त्यांनी काही ट्वीट केले आहे.

राम गोपाळ वर्मा सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात. सामाजिक असो वा राजनैतिक कोणत्याही मुद्द्यांवर ते आपले मत मांडतात. त्यांनी नुकतेच ट्विटद्वारे २ फोटो शेअर केले आहेत. हे फोटो हरिद्वार कुंभमेळा आणि गतवर्षीच्या दिल्ली मश्चिद मध्ये जमा झालेल्या जमातींचा आहे. सोबत ‘मार्च २०२० दिल्ली जमात शॉर्ट फिल्म तर कुंभमेळा २०२१ बाहुबलीयन चित्रपट वाटतो. काय आपण सर्व हिंदूंना मुसलमानांची माफी मागायला हवी, कारण त्यांनी हे कृत्य तेव्हा केले आहे जेव्हा त्यांना काही माहित नव्हते आणि आपण संपूर्ण एका वर्षाबद्दल जाणून आहोत’, असे म्हटले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी पुढील ट्विटमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे नाव घेत लिहिले आहे कि, ‘डाव्या बाजूस कुंभमेळा २०२१ आणि उजव्या बाजूस जमात २०२० आहे आणि या मूर्खपणाचे कारण फक्त देवाचं जाणतो’. त्यांचे हे ट्विट्स प्रचंड वायरल होत आहेत.

तर पुढील ट्विट मध्ये कुंभमेळ्याचा एक फोटो शेअर करत ‘तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर कोरोना अ‍ॅटम बॉम्ब आहे. मला आश्चर्य वाटते की या व्हायरल एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा’ असे म्हटले आहे. रामगोपाल वर्मा यांचे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून ही गर्दी पाहता अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशाप्रकारे गर्दी करणे चुकीचे असल्याचे लोक सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. तर काहींनी त्यांचे हे मत चुकीचे असल्याचे सांगितले आहे. राम गोपाल वर्मा हिंदूच्या विरोधात असल्याचे देखील काहींनी ट्वीट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.