हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचं सर्वाधिक चर्चेत असणारं गोड कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट- कपूर. हि जोडी वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. काल १६ मार्च रोजी अभिनेत्री आलिया भट्ट- कपूरचा ३० वा वाढदिवस झाला आणि यानिमित्त रणबीरने एक छान सेलिब्रेशन करत तिच्यासोबत वेळ घालवला. रणबीरने आलियाचा बर्थडे लंडनमध्ये काही खास लोकांसोबत सेलिब्रेट केला. या सेलिब्रेशनचे काही स्पेशल फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री आलिया भट्ट- कपूरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती रणबीरसोबत दिसते आहे. यातील एका फोटोमध्ये ती बर्थडे केक कापताना आणि सेलिब्रेशन करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाने गुलाबी टी- शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये ती एखाद्या डॉलइतकी सुंदर दिसते आहे. बर्थडेचा चॉकलेट केक कापताना आलियाच्या चेहऱ्यावर आलेलं तेज पाहण्यासारखं आहे. यावेळी ती खूप आनंदी दिसते आहे आणि सोबतच देवाकडे मनातल्या मनात प्रार्थना करताना दिसत आहे.
या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘T H I R T Y ‘ (तीस). या फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर एकत्र खूपच आनंदात दिसत आहेत. रणबीरचा लूक एकदम वेगळा आणि लक्षवेधी दिसतो आहे. त्याने आपले केस लांब केल्याचे दिसत असून हा लूक कदाचित आगामी प्रोजेक्ट्साठी असेल असे बोलले जात आहे. आलियाने तिचा ३० वा वाढदिवस तिच्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्ती म्हणजेच पती रणबीरसोबत साजरा केला आहे. याशिवाय आलियाने तिचा बर्थडे तिची आई सोनी राजदान आणि धाकटी बहीण शाहीन भट्टसोबतदेखील साजरा केल्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोंमध्ये आलियाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी काही खास मित्र मंडळीदेखील सामील झाल्याचे दिसत आहे.
Discussion about this post