Take a fresh look at your lifestyle.

ऐसी कैसी दुश्मनी..? रणबीरकडून ‘या’ सेलिब्रिटींना लग्नाचं आमंत्रणच नाही; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बी टाऊनमधील अतिशय चर्चेत असणारे कपल रा-लिया आज विवाह बंधनात अडकणार आहेत. अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून नुसतीच चर्चा होती. पण अखेर आज मुहूर्त साधणार हे नक्की झाले. दरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अपडेट घेण्यासाठी त्यांचे चाहते सतत सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी मेहंदीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडल्यानंतर नीतू कपूर यांनी आज अर्थात गुरुवारी १४ एप्रिल रोजी रा- लीयाचे लग्न होणार असल्याचे सांगितले. दरम्यान काही सेलिब्रिटीज असे आहेत ज्यांना रणबीरनं लग्नाचं आमंत्रणच दिलेलं नाही. आता हे सेलिब्रिटी कोण आहेत..? आणि त्यांना का बोलावलं नाही हे जाणून घेऊ.

१) गोविंदा – बॉलिवूड इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि रणबीरचं काहीस बरं नातं नाही. त्यामुळे गोविंदा रणबीरच्या शत्रूंपैकी एक असल्याचे बोलले जाते. रणबीरचा जग्गा जासूस हा चित्रपट आला तेव्हा दोघांमध्ये मोठे मतभेद निर्माण झाले होते. मात्र, रणबीरने गोविंदाची माफी मागितल्याने हे प्रकरण मिटले. कदाचित म्हणूनच का काय गोविंदाला लग्नाचं आमंत्रण देण्याचं रणबीरने टाळलं आहे.

२) अनुराग बासू – ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या निमित्ताने अनुराग बासू आणि रणबीर कपूर यांनी एकत्र काम केले होते. मात्र अनुरागने हा चित्रपट बराच उशिरा प्रदर्शित केल्यामुळे रणबीर संतापला. यानंतर अनेक सोहळ्यात समोर समोर येऊनही रणबीर आणि अनुराग एकमेकांशी बोलले नाहीत.

३) संजय लीला भंसाली – संजय लीला भंसाली दिग्दर्शित ‘ सावरिया’ या चित्रपटातून रणबीरने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. मात्र, आजपर्यंत दोघांमध्ये कधीतरी बरं संभाषण झाल्याचे कानी नाही. न जाणे कसला राग कसला फुगवा पण रणबीरने अगदी संजय लीला भंसाली यांच्या ‘बैजू बावरा’मध्येदेखील काम करण्यास नकार दिला होता.

४) रणवीर सिंग – हे भांडण जरा अनोखं आहे कारण यात भांडणचं नाही. त्याच काय आहे रणबीर आणि रणवीर यांच्यात कधी भांडण तर झालं नाही. पण तरीही अबोला कायम आहे. हे कारण आहे कि, दोघांमध्ये इंडस्ट्री लेव्हलला वेगळीच चढाओढ सुरु असते. कदाचित रणवीर दिपवीर झाल्यापासून रणबीरने अंतर राखले असेल असा केवळ अंदाज आहे.

५) कॅटरिना कैफ – रणबीर आणि कॅटरिना हे दोघे कधीकाळी एकमेकांना डेट करत होते. पण जेव्हा दोघांचा ब्रेकअप झाला तेव्हा त्यांचा ‘जग्गा जासूस’ रिलीज होणार होता. दरम्यान कॅटरिनाला रणबीरसोबत चित्रपटाचे प्रमोशन करायचे नव्हते. यामुळे वैयक्तिक वाद चव्हाट्यावर आला आणि परिस्थिती बिघडली.

६) सलमान खान – अभिनेता सलमान खान आणि रणबीर कपूर बोलायला शत्रू नाहीत. मात्र सलमान- कॅटरिना आणि कॅटरिना- रणबीर अश्या समीकरणांमुळे सलमान आणि रणबीरचे संबंध मात्र बिघडले.