Take a fresh look at your lifestyle.

रणबीर – आलियाने साखरपुडा केला ?? रणबीरच्या काकांनी केला मोठा खुलासा

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानला रवाना झालेली ही जोडी गुपचूपपणे साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोन्ही कुटुंबातील मंडळी मंगळवारी जयपुर येथे पोहोचले. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्या चर्चांना रणबीरचे काका अभिनेता रणधीर कपूर यांनी पूर्णविराम दिला आहे. रणबीर आलियाच्या साखरपुड्याच्या केवळ अफवा आहेत असं त्यांनी म्हटल्याचं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नावर अभिनेता रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी म्हटलं आहे की,’जी चर्चा होतेय ती खरं नाही. आज जर रणबीर-आलियाचा साखरपुडा असता तर मी त्यांच्यासोबत असतो.’ पुढे ते म्हणाले की,’रणबीर, आलिया आणि नीतू सुट्ट्या साजऱ्या करायला गेले आहेत. नवीन वर्षांचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेले आहेत. त्यांच्या साखरपुड्याची बातमी खोटी आहे.’ 

दरम्यान, नवीन वर्षाचं स्वागत एकत्र करण्यासाठी आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे राजस्थानला गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ रणवीर सिंग व दीपिका पदुकोणदेखील गेले आहेत. यावेळचे काही फोटो नीतू कपूर यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आणि त्यावरून हे सर्वजण एकत्र असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे रणथंबोरमध्ये रणबीर-आलिया गुपचूप साखरपुडा करणार असल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, ही अफवा असल्याचं रणधीर कपूर यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.