Take a fresh look at your lifestyle.

‘चौपार’ चित्रपटातील ‘रंग बरसे’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पहा व्हिडिओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आगामी चित्रपट ‘चौपार’मधील नुकतेच प्रदर्शित झालेले ‘रंग बरसे’ हे गाणे होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याचा ढंग काही वेगळाच असल्यामुळे होळी आणि धुळवडचा रंग वाढला. यानंतर अगदी २ दिवस उलटून गेले तरी सोशल मीडियावर या गाण्याची धूम कायम आहे. त्यामुळे यंदाचं होळीचं गाणं म्हणून ‘रंग बरसे’चा रंग सगळ्यांना चढला आहे. या गाण्यात मुख्य भूमिकेत असणारे रवी आणि काव्याच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचा लक्ष वेधून घेतला आहे. “मेरे गोरे बदन पे तुने जो मारी पिचकारी, लाल गुलाबी रंगों से मै भिग गयी हू सारी”, असे या गाण्याचे बोल आहेत.

 

 

चौपार या चित्रपटाचे आणि गाण्याचे दिग्दर्शक विजय बुटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटले की, ”नुकतेच आम्ही ‘चौपार’ चित्रपटामधील ‘रंग बरसे’ हे पहिले गाणे प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात दोन राजघराण्यांमधील शत्रुत्वाची कहाणी मांडण्यात आली आहे. हा चित्रपटही होळी सणावर आधारित असल्याने, होळीचे औचित्य साधत या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि हे गाणं अनेकांच्या पसंतीला उतरतंय.”

 

पुढे म्हणाले की, “चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. मला खात्री आहे की चित्रपटाची कथा आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा नक्कीच निराळी आहे, त्यामुळे चित्रपट बघताना रसिक प्रेक्षकही खुर्ची सोडणार नाहीत.”

 

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.