Take a fresh look at your lifestyle.

मालिकेमुळे मुलीचं झालं मनपरिवर्तन;थाटणार या मुलाशी संसार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नुकताच या मालिकेने यशस्वीपणे १०० भागांचा आपला टप्पाही पार केला आहे. वर्णभेदावर भाष्य करणारी ही मालिकामुळे प्रेरीत होऊन यवतमाळ येथे राहणारी राणी भुते या युवतीने एका सावळ्या मुलाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनीअर असणारी २७ वर्षीय राणी रंग माझा वेगळा या मालिकेची प्रचंड चाहती आहे. वर्ण भेदावर भाष्य करणारा मालिकेचा विषय आणि त्यातून दिला जाणारा संदेश राणीला मनापासून आवडल्यामुळेच तिने अनुराग मिसाळ या सावळ्या मुळाशी लग्न करण्याचं ठरवलं आहे आणि तिला या निर्णयात तिच्या कुटुंबाचीही साथ मिळाली आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत कार्तिक हे प्रमुख पात्र साकारणाऱ्या आशुतोष गोखले याच्याशी राणी यांनी संपर्क साधला. मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत या निमित्ताने या जोडप्याला सेटवर बोलवण्यात आलं होतं. रंग माझा वेगळाच्या संपूर्ण टीमने त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या या अनोख्या अनुभवाविषयी सांगताना आशुतोष म्हणाला की, जो विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा मला आनंद झाला आहे. या मालिकेमुळे लोकांचं मतपरिवर्तन होत असेल तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या प्रसंगामुळे आम्ही सर्वच खूप भारावून गेलोय.

 

Comments are closed.

%d bloggers like this: