Take a fresh look at your lifestyle.

अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर रानू मंडलचा डान्स; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रातोरात स्टार होणं फार कमी लोकांच्या नशिबात असत. पण दुर्दैव म्हणजे काहींना ते टिकवता येत आणि काहींना नाही. आता रानू मंडल हे नाव ऐकताच अनेकांना ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं आठवत असेल. जेव्हा हे गाणं रिलीज झालं होतं तेव्हा अनेकांनी रानूची वाहवाह केली होती. पण आजकाल हे गाणे गाणाऱ्या रानूवर कौतुकाचा नव्हे तर टीकांचा वर्षाव होतानाच जास्त दिसतो. अलीकडेच रानू मंडलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रानू ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा असा काही संताप झालाय कि काही विचारू नका. लोकांनी अक्षरशः ट्रोलिंगच्या पण सीमा पार करत रानूवर टीका केल्या आहेत.

पुष्पा या चित्रपटातील प्रत्येक गाणे हिट आहे. सोशल मीडियावर रील बनवायचे म्हटले कि सगळ्यात आधी पुष्पा’च्या गाण्यांचा वापर होतोय. मग असे असताना कुणीही साहजिकच रिल्ससाठी पुष्पा’च्या गाण्यांना पसंती देताना दिसत आहे. यातील श्रीवल्ली गाण्यात अल्लू अर्जुनचा डान्स पाहून जो तो त्याची स्टाईल कॉपी करू पाहतोय. यामध्ये अगदी खेळाडूंपासून, कलाकारांपर्यंत आणि अगदी ते सामान्य व्यक्तींचादेखील समावेश आहे. त्यामुळे या गाण्यावर रानू मंडलने सुध्दा डान्स केला आणि त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. पण रानूला पुष्पा चित्रपटातल्या श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना पाहून नेटक-यांनी तिला ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GNE Bangla (@gnebangla)

या व्हिडिओमध्ये रानु मंडल अत्यंत साध्या कपड्यात दिसतेय आणि त्या गाण्यावर डान्सची मज्जा घेतेय. यात ती तिच्या गावातील घराच्या बाजूला दिसतेय. त्यामुळे अनेक नेटक-यांनी तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेली रानू मंडलला तिचं आयुष्य पहिल्या सारखं जगतं असल्याची पाहायला मिळत आहे. तिच्या इंग्रजी बोलण्य़ावरून तिला अनेकदा नेटक-यांकडून ट्रोल केलं जातं. तसेच तिला अनेकदा तिच्या कपड्यावरून ट्रोल केलं जातं. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी म्हटले कि, हि डान्स करतेय का विनोद..? तर काही नेटकऱ्यांनी म्हटले कि, प्रसिद्ध होण्यासाठी आता हि काहीपण करेल. जा निघ आता कोणीही तुला दुसरी संधी देणार नाही. आणखी काही नेटकऱ्यांनी म्हटले कि, हीला मानसिक उपचारांची गरज आहे.