Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंगचा ’83’ चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार!

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गतवर्षी कोरोना विषाणू मुळे देशभर झालेल्या लॉकडाउन चा फटका बॉलीवूड ला देखील बसला. गतवर्षी चित्रपटगृह बंद असल्याने त्याचा मोठा फटका चित्रपट सृष्टीला बसला. दरम्यान आता मात्र चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेसह उघडली आहेत. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये आता एक नवीन बातमी पुढे आली आहे

रिलायन्स एंटरटेनमेंटचा ’83’ चित्रपटाची रिलाज तारीख पुढे आली आहे. रणवीर सिंगचा चित्रपट ’83’ यंदा 4 जूनला प्रदर्शित होईल. रणवीर सिंगने सोशल मीडियावर याची माहिती देत चाहत्यांना खूश केले आहे. रणवीर सिंहचा हा चित्रपट ’83’ एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. 83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.

रणवीर सिंग चा हा चित्रपट म्हणजे कपिलदेवची बायोपिक असून 1983 च्या वर्ल्ड कपवर याची कहाणी आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारत आहे. सुनील गावस्करची भूमिका ताहिरराज भसीन साकारणार आहे. याशिवाय साकीब सलीम मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी म्हणून साहिल खट्टर, मदन लालच्या भूमिकेत हार्डी संधू आणि चिराग पाटील यांच्या भूमिकेत संदीप पाटील असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.