Take a fresh look at your lifestyle.

दादासाहेब फाळके पुरस्कारात रणवीर सिंगची बाजी; पोस्ट करून चाहत्यांचे मानले आभार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत महत्वाचा आणि नामांकित समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आपल्याला मिळावा असे प्रत्येक कलाकाराला वाटते. या पुरस्काराचे एक विशेष महत्व आहे आणि दरवर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार २०२२ च्या विजेत्यांची यादी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये ८३ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यानंतर रणवीरने सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानले आहेत. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२२ चे आयोजन या रविवारी ताज लँड्स एंड, मुंबई येथे करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने सोशल मीडियावर अवॉर्ड ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२२ मध्ये ‘८३’ साठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा’ पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद!

याशिवाय एक व्हिडीओ पोस्ट करीत यात रणवीर भावुक होऊन बोलताना दिसतोय कि, मी दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स आणि चाहत्यांचे सादर आभार मानतो कि तुम्ही मला या पुरस्काराच्या लायक समजलात. जेव्हढं प्रेम आणि सन्मान मला हे पात्र साकारण्यासाठी तुम्ही दिलात कदाचितच मला माझ्या १० वर्षाच्या कार्यकीर्दीत लाभलं असेल.

पुढे म्हणाला, मी नेहमीच स्वतःला चॅलेंज देतो. नवनवीन पात्र साकारण्यासाठी प्रयत्न करतो आणि जर यशस्वी होतो तर ते फक्त तुमच्यामुळेच. ८३ हा चित्रपट माझ्यासाठी फारच खास होता. याचे कारण म्हणजे हा एक इतिहास आहे आणि यात मी साकारत असलेली भूमिका अत्यंत खास व्यक्तीची आहे. एकमेव कपिल देव. त्यांची भूमिका मी साकारली याहून मोठा आनंद आणि सन्मान काय..या चित्रपटाचा प्रवास अत्यंत रोमांचक होता आणि याच चित्रपटाची दखल घेत मला कपिल देव यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला हा मी माझा मोठा सन्मान समजतो. मनापासून खूप खूप खूप जास्त आभार माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचे. खूप धन्यवाद!