Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार!’

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन । सध्या तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला रणवीर सिंग ‘रामलीला’ नंतर पुन्हा एकदा गुजराती अवतारात दिसणार आहे. पद्मावती चित्रपटात खिलजीची नकारात्मक आणि गंभीर भूमिका निभावल्या नंतर ‘जयेशभाई जोरदार’ बनून तो एक हलकं फुलकं अतरंगी स्वभावाचं पात्र निभावणार आहे.

आजवर केलेल्या अनेक भूमिकांमध्ये त्याने जीव आणि ऊर्जा ओतली आहे, त्यामुळे त्याचा चित्रपटांबद्दल आणि विशेष करून पात्रांबद्दल नेहमीच उत्सुकता असते. त्याचप्रकारे हे पात्रही खूप इंटरेस्टिंग भासत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या फर्स्ट लूक विषयी बऱ्याच प्रतिक्रिया आणि चर्चा होत आहेत. रणवीरने सध्याच ‘८३’ या कपिल देवच्या बायोपिकची शूटिंग संपवली आहे.

‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटात रणवीर एका सामान्य माणसाची भूमिका निभावत आहे. स्त्रियांबद्दल समाजात असलेली संकुचित वृत्ती आणि त्यांच्याबद्दल समाजात बनणारी चुकीची मत यावर हा सिनेमा भाष्य करणार आहे. या पोस्टरवरील लूकमध्ये त्याचा पेहराव आणि हेरस्टाईल दोन्ही थोडं ओल्डस्कुल दिसत आहे. कपड्यांचे गडद रंग त्याचं पात्र विनोदी असल्याचं अंदाज देतायत.

Ranveer’s ‘Jayeshbhai Jordar’ movie First Look

Leave a Reply

%d bloggers like this: