Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंग म्हणतोय ‘शाहरुख खान खरा गॅंगस्टर आहे’; काय आहे प्रकरण..?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत भारी माणूस प्रेक्षकांचा लाडका सिंबा अर्थात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चर्चेत असतो. कधी हटके स्टाईल तर कधी किलर स्माईल. नाहीतर त्याचे आगामी प्रोजेक्ट त्याच्या चर्चेचे कारण ठरताना दिसतात. रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या सगळीकडे रणवीर सिंगच्या याच सिनेमाची चर्चा सुरू आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान बॉलीवूडचा किंग शाहरुख खान विषयी त्याने असं काही वक्तव्य केलंय कि आता सिनेमा बाजूला राहिलाय आणि याचीच चर्चा सुरु झाली आहे. रणवीरने चक्क शाहरुखला खरा गँगस्टर म्हटलं आहे. होय होय गँगस्टर. पण तो असं का म्हणाला…? तेच आपण जाणून घेऊ.

जयेशभाई जोरदार या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीत रणवीर सिंग म्हणाला कि, ”शाहरुख खान यांनी खरंच भारतीय सिनेमात खूप मोठं काम केलं आहे, यात काहीच शंका नाही. ते आज ‘बॉलीवूडचा किंग’ म्हणून ओळखले जातात. एकदा शाहरुख यांच्या उपस्थितीत मी एक जोक मारला होता. मी कोणातरी एका दुसऱ्याच व्यक्तीला म्हणत होतो कि शाहरुख स्वतः कधी बोलणार नाही, पण त्यांनी एक मॉल बनवला आहे. ज्यामध्ये आम्ही सगळे दुकान चालवत आहोत आणि हे खरं आहे जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी भारतीय सिनेमाला एक योग्य आकार दिला आहे. त्यांचं मोठं योगदान इथे आहे. त्यांनी अॅवॉर्ड शोज, लाइव्ह शोज, जाहिराती, सिनेमाचे प्रमोशन्स कसे करायचे याचे अनेक दाखले घालून दिले आहेत.

ते एक बेंचमार्क आहेत. एक आदर्श माणूस आहेत आणि या सगळ्याचे ते खरे मानकरी आहेत”. याच मुलाखती दरम्यान एका व्यक्तीने शाहरुख एक गॅंगस्टर पण आहेत ना..? असं म्हटलं आणि तेव्हा रणवीर म्हणाला, ”हो, तोच खरा गॅंगस्टर आहे. एकदम बेस्ट गॅंगस्टर.. आणि माझं त्याच्यावर खरंखुरं खूप प्रेम आहे. माझ्या मनात त्याच्यासाठी खूप सम्मान आहे, मी उत्सुक आहे त्याच्या आगामी सिनेमासाठी”. शाहरुखसाठी रणवीर सिंगचं प्रेम याआधीही अनेक इव्हेंट्समध्ये पहायला मिळालं आहे. यावेळी काय तर गँगस्टर शाहरुखविषयी बोलताना रणवीरने कौतुकाचे पूल बांधले आहेत. हे प्रेम असच राहूदे इतकीच कामना आपण करू शकतो. तूर्तास रणवीरचा जयेशभाई आणि शाहरुखचा पठाण रिलीज होण्याच्या मार्गावर आहे.