Take a fresh look at your lifestyle.

दीपिकाच्या ‘त्या’ कमेंटमुळे रणवीरला व्हावं लागलं ट्रॉल

मुंबई | रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आणि त्या फोटोवर दीपिकाने कमेंट केली. तिच्या ही भन्नाट कमेंट ऐकून रणवीरच्या चाहत्यांनी तर त्याला भलतचं ट्रोल केल आहे. रणवीरने आपला वघासोबत असलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. व खाली कॅप्शनमध्ये लिहिलं, आता हे कोणी केलं? त्यावर दीपिकाने कमेंट करून ती रणवीरला म्हणाली, ‘यात तुला कोणती गंमत दिसतेय? तू तर नेहमीच अशा लूकमध्ये असतोस. तिची ही कमेंट वाचल्यावर मात्र चाहत्यांनी त्याला चांगलच ट्रोल केल.

त्याने टाकलेल्या या फोटोतील पोझ ही अमेरिकेत प्राणी संग्रहालयाची देखभाल करणाऱ्या जो एक्झॉटिकचा आहे. त्याच्याच लूकमध्ये रणवीर या फोटोत दिसत आहे. मात्र रणवीर हा सतत नवीन लुकमध्ये दिसत असतो. त्यामुळे दीपिकाला काही हे नवीन वाटल नाही आणि तिने आपल्या नवऱ्याच्या पोस्टवर कमेंट केली. मात्र काही वेळातच चाहत्यांनी रनविराला ट्रोल केल.

View this post on Instagram

😆🤣😂

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे चाहते भरपूर आहेत. त्याचसोबत त्यांची ऑफस्क्रीन मजामस्तीसुद्धा चर्चेचा विषय ठरते. दोघांपैकी एखाद्याने सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला आणि दुसऱ्याने त्यावर कमेंट केली नाही, असं होतंच नाही. जाहीररित्या प्रेम दाखवण्यात हे जोडपं कधीच मागे राहिलं नाही, त्याचप्रमाणे खुलेपणाने ते एकमेकांची मस्करीही करताना दिसतात. या पोस्टमध्येही दीपिकाने रणवीरची मस्करी केली आहे.