हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या आगामी ”८३ द फिल्म” या चित्रपटाविषयी सतत चर्चा आहे. या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर समोर आले आहे, ज्यात रणवीर सिंग ज्येष्ठ दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवच्या भूमिकेत क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी उचलताना दिसत आहे. या चित्रात त्याने पुन्हा एकदा त्या देखाव्याची पुनरावृत्ती केली आहे जेव्हा भारताने प्रथमच विश्वचषक करंडक जिंकला होता. हा चित्रपट १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना रणवीर सिंहने ‘ये है ८३ ‘ या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. कबीर खान यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. हे हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होईल.
या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाशिवाय ताहिर राज भसीन, साकीब सलीम, अॅमी विर्क, जीवा, हार्डी संधू, साहिल खट्टर, चिराग पाटील, आदिनाथ कोठारी, धैर्य करवा, दिनकर शर्मा, निशांत दहिया, जतिन सरना, आर बद्री, बोमन इराणी, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, पार्वती नय्यर आणि आदिती आर्या हेदेखील दिसणार आहेत.
” ८३” चित्रपटातील जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत. ”८३” मध्ये दीपिका रोमी देवच्या भूमिकेत दिसणार आहे. रोमी देव क्रिकेट दिग्गज कपिल देव यांची पत्नी आहे. दोघांनी ‘गोलियां की रसलीला राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ मध्ये एकत्र काम केले आहे.
या चित्रपटाशिवाय रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ मध्येही दिसणार आहे. नवोदित लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित ‘जयेशभाई जोरदार’ हा गुजरातच्या पार्श्वभूमीवर आधारित एक मजेदार चित्रपट असून रणवीर गुजराती माणसाची भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! 🤓💗💪🏾 #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf