Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंगचा ’83’ इंटरनेटवर झाला लीक; बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार गंभीर परिणाम

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित ’83’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ’83’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून या चित्रपटाचं कथानक भारताच्या विश्वचषक विजयाचा प्रवास दाखवणारं आहे. संपूर्ण चित्रपट हा भारताचे विश्वचषकातील सामने आणि टीम स्पिरीटवर आधारलेला असल्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी आहे. रिलीजनंतर चित्रपटाला उत्तम रिव्ह्यू मिळत असून प्रेक्षकांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामे करेल असे दिसत असताना निर्मात्यांना आता मोठा धक्का पचवावा लागतोय. 83 हा चित्रपट रिलीज काय झाला इंटरनेटवर लिकदेखील झाला आहे.

’83’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान हा चित्रपट रिलीज करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून वाट पाहत होते. चित्रपटाची स्टारकास्ट तगडी असून हा चित्रपट अव्वल कामे करणार अशी आशा होती. मात्र इंटरनेटवर लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. समीक्षकांनि दिलेल्या मतानुसार हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करणार आहे. चित्रपटाची कामे इतिहास रचणारी असेल. मात्र रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा ’83’ हा चित्रपट चित्रपटगृहात आणि इंटरनेटवर एकत्र दिसत असल्यामुळे लोकांनी ऑनलाईन चित्रपट पाहणे पसंत केले आहे.

माहितीनुसार ’83’ हा चित्रपट TamilRockerz, Filmyzilla, Mp4moviez, Filmywap, Moviesflixवर चित्रपट लीक झाला आहे. या वेबसाइट्सवर पूर्ण चित्रपट HD मध्ये उपलब्ध आहे. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत अनेकांनी 83 फ्री डाउनलोड करून पाहिला आहे आणि अजूनही हा चित्रपट ऑनलाईन पाहता येतोय. हि निश्चितच वाईट बातमी आहे. यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीवर अगदीच पाणी फिरले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यासह या जतिन सरना, ताहिर राज भसीन, आदिनाथ कोठारे, एमी विर्क, हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.