Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला मोठी मागणी; PETA संस्थेचं अभिनेत्याला पत्र

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत आलं होतं. या फोटोशूटमुळे सोशल मीडिया ट्रोलिंग आणि अगदी चाहत्यांचा रोषदेखील रणवीरला सहन करावा लागला. एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी त्याने केलेल्या या फोटोशूटवरून विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. पण बॉलिवूडकर मात्र रणवीरच्या पाठीशी उभे होते. या गदारोळानंतर आता रणवीरच्या न्यूड फोटोशूटला डिमांड आली आहे. ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ने (पेटा, PETA) या संस्थेने रणवीर सिंगला पत्र लिहून त्यांच्यासाठी न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे.

पेटा संस्थेने रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट करण्याबाबत विनंती करणारे पत्र लिहिले आहे. PETA ने रणवीरला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय कि, ‘तुम्ही आमच्या मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करू शकता का..?’ मुख्य म्हणजे, प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या या संस्थेने रणवीर सिंगल न्यूड फोटोशूट करून त्यांच्या मोहिमेद्वारे शाकाहारी खाद्य पदार्थांना प्रोत्साहन द्यावे असा संदेश देण्याची विनंती केली आहे. या NGOने रणवीरला पेटा इंडियासाठी न्यूड फोटोशूट करण्याबाबत विनंती करताना पामेला अँडरसनचं उदाहरण दिलंय. कारण अभिनेत्री पामेला अँडरसनने पेटासाठी तसं फोटोशूट याआधी केलं आहे.

अभिनेता रणवीर सिंगने केलेलं न्यूड फोटोशूट हे इंटरनॅशनल लेव्हलचं फोटोशूट होत. त्याने पेपर मॅगझीन साठी हे फोटोशूट केलं होतं. तरीही चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेच्या ललित टेकचंदानी यांनी या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 292, 293, 509 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या फोटोशूटमुळे महिलांसह सर्वांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान आमिर खान, आलिया भट्ट, विद्या बालन, अर्जुन कपूर, राखी सावंत अशा अनेक कलाकरांनी रणवीरला पाठिंबा दिला होता.