Take a fresh look at your lifestyle.

रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ बोले तोह एकदम दमदार; पहा कॉमेडी ट्रेलर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके स्टाईल आणि कॉमिक टायमिंगमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसतो. त्यामुळे त्याचे जवळ जवळ सगळेच चित्रपट हिट पे हिट असतात. यानंतर आता आणखी एक हास्याचा धमाका घेऊन तो लवकरच येतोय. रणवीरच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग एका हटके गुजराती व्यक्तीची भूमिका साकारतोय. इतकेच नव्हे तर त्याच कॉमिक टायमिंग पुन्हा एकदा तुम्हाला खळखळून हसायला लावणार आहे. त्यामुळे तयार व्हा हसायला! पहा ट्रेलर

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जयेशभाईच्या भूमिकेत रणवीर दिसतोय. हा जयेशभाई त्याच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबीयांविरोधात लढतो आहे. हा चित्रपट केवळ कॉमेडीय जॉनरचा नाही आहे. तर कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्यात आला आहे. मुलगाच हवा असा हट्ट करणाऱ्या कुटुंबीयांना जोरदार चपराक लावणारा हा चित्रपट आहे.

यामध्ये रणवीरसोबत बोमन इराणी, रत्ना पाठक शाह आणि शालिनी पांडे या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता दिव्यांग ठक्करने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर विशाल- शेखर आणि अमित त्रिवेदी यांनी या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे. येत्या १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिनेता बोमन इराणी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी रणवीरच्या आई- वडिलांची भूमिका साकारली आहे. जुन्या विचारसरणीचे जयेशभाईंचे बाबा हे गावातील सरपंच (बोमन) आहेत. तर त्यांच्या बुरसटलेल्या विचारसरणीला पाठिंबा देणारी त्यांची पत्नी (रत्ना) हाऊस वाइफ आहे पण तिला नातूच हवा अशी हौस आहे. दरम्यान चित्रपटातील कथानकात जयेशभाईची पत्नी गरोदर असते आणि तिला मुलगी होणार असल्याचं जेव्हा डॉक्टर सांगतात, तेव्हा आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी जयेशभाई वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतो. मग एक सामान्य माणूस मुलीला वाचवण्यासाठी गरोदर पत्नीसह आपल्या कुटुंबापासून दूर पळून जाण्याची हिंमत कुठून आणतो आणि कसे आपल्या कटुंबाला वाचवतो ते या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची रंगात अनुभवायची असेल तर चित्रपट पाहायला विसरू नका. येत्या १३ मी रोजी सर्वत्र चित्रपटातगृहात प्रदर्शित होतोय ‘जयेशभाई जोरदार’.