Take a fresh look at your lifestyle.

रणविजय सिंग दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; भूमिकेसाठी घेतली खूप मेहनत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रणविजय सिंग आणि सनी लिओनी ही जोडी सातव्यांदा एमटीव्ही ‘स्प्लिट्सविला एक्‍स ३’चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. मात्र रणविजय आता लवकरच सुमेर सिंग केस फाइल्स गर्लफ्रेंडमध्ये एका पोलिसाची आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसतोय. 1 एप्रिलला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून रणविजय चा हा लूक प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे.

रणविजयने एसीपी सुमेरसिंगची भूमिका साकारताना दिसतोय. त्यासोबत करिश्मा शर्मा, प्रियांका पुरोहित, अदिती आर्य आणि अलीशा मेयर यांनी त्याच्या ‘गर्लफ्रेंड्स’ची भूमिका साकारली आहे. सुमेरसिंग केस फाईल्स: गर्लफ्रेंड्सची कथा एका प्रामाणिक आणि मेहनती पोलिस अधिकाऱ्याच्या जीवनाचे भाष्य करणारी आहे. या वेब सीरिजमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याविषयी रणविजय सिंग म्हणाला, “सुमेर सिंगची व्यक्तिरेखा साकारण्यात मला खूप आनंद झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी रिऍलिटी शोचे बरेच चढ उतार पाहिले. दरम्यान मला एका पोलीस अधिकाऱ्याची वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेला न्याय देण्यासाठी, मी स्वतःला त्या भूमिकेत झोकून दिलं. तसेच पहिल्या भागाला मिळालेल्या प्रेमामुळे मी खूप भारावून गेलो होतो आणि प्रेक्षकही आमचा नवीन सीझन पाहण्यास उत्सुक आहेत याचा आनंद वाटतो. मी आशा करतो की, प्रेक्षकांना नवीन सिजन पाहायला खुप आवडेल.

आतापर्यंत रामविजय सिंग ने विविध रिऍलिटी शो मध्ये होस्ट तर कधी जज म्हणून भूमिका भूषविलया आहेत. स्प्लिट्स व्हिला, रोडीज यांच्या यशानंतर अशी आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल रामविजय अत्यंत आनंदी आहे. तसेच या भूमिकेत उठून दिसणाऱ्या रणविजयला त्याच्या चाहत्यांकडून कॊतुकाची थाप मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.