Take a fresh look at your lifestyle.

रॅपर हनी सिंगला अटक होणार?; डोमेस्टिक वायलेंस कायद्याअंतर्गत पत्नीची न्यायालयात धाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध रॅपर हनी सिंग अर्थात हृदेश सिंहच्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली आहे. त्याची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर थेट न्यायालयात धाव घेत शालिनीने ‘द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस अॅक्ट’अंतर्गत एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. हि याचिका तिने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात दाखल केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती तानिया सिंह यांच्या समक्ष ही याचिका सादर करण्यात आली आहे. यात असे म्हटले आहे की,”शालिनीला मारहाण केली जात आहे आणि मानसिक शोषणही केले जात आहे.” मात्र अद्याप हनी सिंगला अटक केली जाईल असे कोणतेही वृत्त जाहीर झालेले नसून याची शक्यता नाकारता येत नाही.

‘आज तक’च्या रिपोर्टनुसार वकील संदीप कपूर, अपूर्वा पांडे आणि जी.जी. कश्यप यांनी हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारच्या वतीने ही याचिका न्यायमूर्तींसमोर मांडली. पुढे न्यायालयाकडून हनी सिंगविरोधात एक नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे. यामध्ये हनी सिंगने २८ ऑगस्ट २०२१ पूर्वी जरी केलेल्या नोटीसवर उत्तर देणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, दोघांची मिळून असणारी संपत्ती विकायची नाही आणि स्त्रीधनाशी कोणताही खेळ न करण्याची सूचनादेखील या नोटीसमध्ये बजावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रॅपर हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यात शारीरिक आणि लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि आर्थिक हिंसा अश्या आरोपांची तिने यादीच लगावली आहे. साधारण २० वर्षांची मैत्री आणि रिलेशनशीपमध्ये आल्यावर २०११साली हनी सिंग आणि शालिनी यांनी शीख धर्माच्या नियम आणि पद्धतीनुसार लग्न करीत एकमेकांचा हात हातात घेतला. हा सोहळा दिल्लीतील एका फार्महाऊसवर पार पडल्यामुळॆ त्याची फार चर्चा झाली नव्हती.