Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना ; घेणार तब्बल ‘इतके’ मानधन ??

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व गाजवल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. आपल्या सौदर्याच्या जोरावर रश्मिकाने  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली आता ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदानाने विकास बहल यांचा ‘डेडली’ हा आगामी चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. चित्रपटासाठी रश्मिकाने चक्क कोटींच्या घरात मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. डेडली’ चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल ५- ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विकास बहल यांनी चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही.

डेडली’ हा एक विनोदी चित्रपट असून, तो विकास बहल दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘डेडली’मध्ये नीना गुप्ता आणि इतरही अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असेल. ‘डेडली’ हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटची निर्मिती असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.