Take a fresh look at your lifestyle.

हॅपी बर्थडे रश्मिका! चाहत्यांच्या शुभेच्छांना मिळणार रिटर्न गिफ्ट; साऊथनंतर आता बॉलिवूडमध्येही जलवा करण्यास सज्ज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह देशभरात लाखोंचा चाहता वर्ग तयार करणारी, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त लाखो चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहेत. आज वयाच्या २५व्या वर्षात रश्मिका पदार्पण करतेय. सोबतच साऊथनंतर आता बॉलिवूडमध्येही जलवा करण्यास ती पूर्ती सज्ज झाली आहे. अवघ्या काही काळातच यशाचे शिखर गाठणारी रश्मिका लवकरच बॉलीवूडमध्ये सुद्धा दिसणार आहे.

२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘किरीक पार्टी’ या कन्नड सिनेमातून डेब्यू करणाऱ्या रश्मिकाने आत्तापर्यंत तमिळ, तेलगुसह अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाचे साऱ्यांनी कौतुक केले. हा सिनेमा त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. रश्मिकाने आत्तापर्यंत १० ते ११ सिनेमांमध्येच काम केले. मात्र या सिनेमांमधील अभिनय आणि तिच्या अदांनी अनेको घायाळ केले आहेत. २०२० मध्ये गुगलने रश्मिकाला नॅशनल क्रशचे टायटल दिले. यामुळे तिच्या प्रसिद्धीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे.

कर्नाटकच्या विराजपेठा या गावात रश्किमाचा जन्म झाला. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यामध्ये पदवी घेतली आहे. दरम्यान महाविद्यालयीन काळापासून तिने मॉडेलिंग क्षेत्रातील करियरला सुरुवात केली. यानंतर अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये देखील ती झळकली. २०१५ मध्ये बेंगळूर येथे झालेला टॅलेंट हंट पुरस्कार तिच्या करियरमधील टर्निंग पाँइट ठरला. रश्मिकाच्या उत्कृष्ट अभिनयाची भुरळ दिग्दर्शक रिषभ शेट्टीला पडली आणि वयाच्या १९ व्या वर्षी तिला किरिक पार्टी सिनेमाची ऑफर आली. या चित्रपटाच्या सेटवर रश्मिकाची अभिनेता रक्षित शेट्टी यासोबत मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले असता, त्या दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली. पुढे २०१७ मध्ये दोघांचा साखपुडाही झाला. परंतु सर्वकाही सुरळीत असताना २०१८ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर आजही दोघे एकमेकांसोबत पून्हा दिसले नाहीत. तसेच तीन वर्षे उलटून गेली, तरी आपल्या नात्यातील दूराव्यावर दोघांनीही कोणतेच वक्तव्य केलेले नाही.

रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासह ‘गुड बाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रासह ‘मिशन मजनू’ या सिनेमातही ती मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणार आहे. रश्मिका सध्या अल्लू अर्जूनसोबत ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.