Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अग्निहोत्रींच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’मधून रिअल लाईफ वॉरियर्स येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
The Vaccine War
0
SHARES
83
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या भव्य यशानंतर विवेक अग्निहोत्री हे नाव सर्वश्रुत झाले आहे. या चित्रपटानंतर अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा कोरोना काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञांसह, जगातील सर्वात प्रभावी लस तयार करण्यासाठी २ वर्षांहून अधिक काळ रात्रीचा दिवस करून मेहनत करणाऱ्या त्या प्रत्येकावर आधारित आहे. या चित्रपटात जागतिक उत्पादकांच्या दबावाला न जुमानता देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी झटलेलेया भारतीय शास्त्रज्ञांची कथा आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत नाना पाटेकर आणि अनुपम खेर दिसणार आहेत. तसेच चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.

From the sets of #TheVaccineWar.
Independence Day. 2023. pic.twitter.com/8rySVpKfz9

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 4, 2023

काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, चित्रपटाच्या कलाकारांसह चित्रपट निर्माते अनेक घोषणांचा जयजयकार करताना दिसले. यात त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या आहेत. ‘व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या सेटवरून, स्वातंत्र्य दिन २०२३ असे कॅप्शन देत अग्निहोत्रींनी हा व्हिडीओ शेअर केला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे कि, हा चित्रपट या वर्षात स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट एक दोन नव्हे तर ११ भाषांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे.

ANNOUNCEMENT:

Presenting ‘THE VACCINE WAR’ – an incredible true story of a war that you didn’t know India fought. And won with its science, courage & great Indian values.

It will release on Independence Day, 2023. In 11 languages.

Please bless us.#TheVaccineWar pic.twitter.com/T4MGQwKBMg

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 10, 2022

सेवरील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बोलले जात आहे कि, हा चित्रपट ‘सत्यकथेवर’ आधारित असून यामध्ये भारतातील खरे वॉरियर्स दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले आहे कि, ‘हे सिख वोलेंटीअर्स आहेत ज्यांनी दुसऱ्या लाटेत आपला जीव धोक्यात घालून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात मदत केली होती. ही कथा एक वास्तव आहे, त्यामुळे आम्ही शक्य तितक्या रिअल लोकांना कास्ट करत आहोत. जगातील काही प्रतिष्ठित संस्थांच्या सहकार्यानं सखोल संशोधनावर आधारित हा भारतातील ‘सत्यकथा’ शैलीतील पहिला चित्रपट असणार आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटामार्फत भारतीय सिनेमा एका नव्या स्तरावर नेण्याचा आणि चित्रपटांना भारताची सॉफ्ट पॉवर म्हणून वापरण्याचा प्रयत्न आहे.’

Tags: Bollywood Upcoming MovieDirector Vivek AgnihotriThe Vaccine WarTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group