Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी लंडनहून मुंबईत उतरलो आणि..’; Insta’च्या सोनावणे वहिनीने शेअर केला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 6, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Karan Sonawane
0
SHARES
64
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आत्ताचं युग हे सोशल मीडियाचं आहे. त्यामुळे प्रत्येक वयातील व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. सिनेमा, थिएटर याशिवाय आता रिल्सने सगळ्यांनाच वेड लावलंय. भन्नाट कंटेन्ट देऊन काही कलाकार रिल्स स्टार म्हणून उदयास आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे करण सोनावणे. जो focused indian या नावाने इंस्टावर सक्रिय आहे आणि त्याचे सोनावणे वहिनीचे रिल्स भन्नाट व्हायरल होतात. या रील स्टारने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान एक कमालीचा किस्सा घडला आणि तो सांगताना करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Sonawane (@focusedindian)

नवं तंत्रज्ञान आणि कलाकृती संबंधी जागरूक राहण्यासाठी आणि नवीन कलाकारांना भेटून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे कायमच कार्यरत असतात. तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या घरी मराठीतील सुप्रसिद्ध कन्टेन्ट क्रियेटर्सची भेट घेतली. यामध्ये इंस्टाच्या सोनावणे वहिनी अर्थात करण सोनावणेसुद्धा सहभागी होता. मुख्य म्हणजे करण त्याच्या आई बाबांसोबत लंडनला फिरायला गेला होता. पण राज ठाकरेंनी स्वतःहून आमंत्रण दिल्याचं समजताच पहिल्या विमानाने करण लंडनहून थेट शिवतीर्थावर पोहोचला. तर करणने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत या भेटीचा किस्सा शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Sonawane (@focusedindian)

या भेटीविषयी सांगताना करण म्हणाला कि, ‘ग्रेट भेट विथ द ग्रेट व्यक्ति… या फोटोमागील गोष्ट.. मी त्यांना सांगितलं कि मी लंडनहून मुंबईत उतरलो आणि थेट तुम्हाला भेटायला आलो’. तेव्हा राज ठाकरे त्याला म्हणाले, ‘मुंबईत खूप गर्मी आहे.. तुझ्या हाताचा जरा स्पर्श घेतो म्हणजे ठंड वाटेल’. राज ठाकरे तुमचा टायमिंग कधीच चुकत नाय! तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं… आपलं वाटलं! कधीतरी तुमची निवांत मुलाखत घ्यायला मला खूप आवडेल… GENzच्या भाषेत PODCAST’.

View this post on Instagram

A post shared by सिद्धांत दिपक सरफरे (@sidhantsarfare)

हा भन्नाट अनुभव करणने आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. शिवाय राज ठाकरेंना भेटणं हा आयुष्यातला भन्नाट अनुभव आहे, असंदेखील करणंच म्हणणं आहे. करण सोनावणे आणि सिद्धांत सरफरे यांचे सोनावणे वहिनी आणि सरफरे वहिनी यांच्या भन्नाट संभाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत.

Tags: Instagram PostKaran SonawaneMarathi Reel MakersRaj ThackreyViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group