Take a fresh look at your lifestyle.

आर्यन खानची तुरूंगातून अटी मान्य सुटका; शाहरुखच्या बॉडीगार्डसह मन्नतकडे रवाना

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान २५ दिवसांच्या तुरुंगवासानंतर काळ हाय कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. यानंतर आज २९ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याची तुरुंगातून अटी मान्य सुटका झाली आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनाही हाय कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. दरम्यान आर्यनला जमीन मिळाला असला तरीही त्याची सुटका झालेली नाही. त्यामुळे त्याला काही अटी मान्य कराव्या लागल्या आहेत. तो शहराबाहेर वा देशाबाहेर जाऊ शकत नाही. जर त्याला देशाबाहेर जायचे असेल, तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. हायकोर्टाने आर्यनला दुपारी पाच पानी जामीन मंजूर केला. आर्यनला तुरुंगात घेण्यासाठी शाहरुख खानचा अंगरक्षक रवी रेंज रोव्हर गाडी घेऊन पोहोचला होता. बरोबर ११ वाजून २ मिनिटांनी आर्यन खान तुरुंगातून बाहेर पडला गाडीत बसला आणि घराकडे रवाना झाला आहे.

दरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना प्रदीर्घ सुनावणीनंतर गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यनच्या जामीन अर्जावर हायकोर्टात तीन दिवस सुनावणी झाली. आरोपींना जामीन मिळू नये म्हणून NCBने पूर्ण ताकद लावली मात्र, दुसरीकडे शाहरुखनेही कोर्टात अनेक ज्येष्ठ वकिलांची फौज उभी केली. आर्यनच्या वकिलांमध्ये मुकुल रोहतगी, सतीश मानशिंदे या ज्येष्ठ वकिलांचा समावेश होता. अखेर आज आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. यामुळे शाहरुख खान, गौरी खान आणि अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनावर सही करण्यासाठी सेशन्स कोर्टात दाखल झाली आहे. सेशन्स कोर्टात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जामीन ऑर्डरवर जुही चावला हिने हमीदार म्हणून सही केली. यानंतर हि कागद पत्रे आर्थर रोड जेल प्रशासनाकडे पाठवण्यात आले. खरंतर कालच त्याची सुटका झाली असतो. मात्र कोर्टातून वकिलांना आर्थर रॉड जेलमध्ये पोहोचण्यास उशीर झाला आणि कामकाजाची वेळ निघून गेल्यामुळे कालची रात्र आर्यनने तुरुंगातच घालवली.

या सर्व प्रकारानंतर अखेर आज आर्यन खानची तुरूंगवासातून तर सुटका झाली मात्र, त्याला १ लाख सुरक्षा ठेव भरावी लागली आहे. तसेच न्यायालयाच्या अटींनुसार आर्यनला दर शुक्रवारी NCB ऑफिसमध्ये हजर राहावं लागेल. तसेच तो न्यायालयाच्या कामकाजाबाबत कोणतेही वक्तव्य करू शकत नाही. पुराव्यांशी छेडछाड करू शकत नाही. दरम्यान त्याच्या जामिनावर हमीदार म्हणून सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात हजर राहिली होती आणि यानंतर आता आर्यनने अखेर तुरुंगातून बाहेर पडून सुटकेचा श्वास घेतला आहे. आर्यनला मुंबई हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली होती. तर आज शाहरुखच्या चाहत्यांनी अगदी आनंदोत्सव करायला सुरुवात केली आहे. तसेच वेलकम प्रिंन्स आर्यन असे बॅनर मन्नत बाहेर दिसत आहेत.

आर्यनला अटक झाल्यानंतर २५ दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला. मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी एनसीबीने आर्यनला अटक केली होती. एनसीबीची केस अशी आहे की, आर्यनने एकप्रकारे जाणीवपूर्वक अमलीपदार्थ बाळगले होते. त्याचे अमलीपदार्थ विक्रेत्यांशी संबंध आहेत आणि अटकही वैध आहे. तो कटाचा एक भाग आहे. दरम्यान एनसीबीचा तपास अजून सुरु आहे. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करु शकतात, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांच्याकडून करण्यात आला होता.