Take a fresh look at your lifestyle.

‘हेय ढोलिडा’… धम धम धमक बाजे; ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सत्य घटनेवर आधारित असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ घटला आहे. याआधी ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यानंतर या चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. तर अनेकांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहून आणि शिर्षकावर आपला निषेध नोंदवला आहे. पण ज्या चित्रपटाची निर्मित संजय लीला भन्साली यांची असेल तो चित्रपट वादळ नसेल तर मजा काय..? यानंतर कोणत्याही गोष्टीला न जुमानता गंगुबाई काठियावाडी चित्रपटातील पहिले वहिले गाणे रिलीज झाले आहे. एकदम एनर्जेटिक असे ‘ढोलिडा’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

‘हेय ढोलिडा’… धम धम धमक बाजे असे या एनर्जेटिक गाण्याचे बोल आहेत. “गंगुबाई काठियावाडी” या चित्रपटातील ‘ढोलिडा’ हे पहिले गाणे आहे. हे गाणे संजय लीला भन्साली यांनी स्वतः संगीतबद्ध केले आहे. तर, जान्हवी श्रीमंकर आणि शैल हाडा यांनी हे धमाकेदार गरबा थीम सॉंग गायले आहे. तसेच कुमार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

‘ढोलिडा’ हे गाणे गरबा थीम सॉंग असून हे गाणे कृती महेशने कोरिओग्राफ केले आहे. या चित्रपटातील मुख्य गंगुबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री आलिया भट्टने ‘ढोलिडा’ गाण्यावर असे नृत्य केले आहे कि ते पाहून कुणाचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. हे गाणे रिलीज होऊन अगदी तासभर पण झालेला नाही तोवरच गाण्याने ५० हजार व्ह्यूज पार केले आहेत. यावरून गाण्याची जबरदस्त एनर्जी समजून येतेय.

नुकतीच ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शीर्षकाविरोधात काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी आपली भूमिका दर्शविली आहे. नाव बदल अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देत पटेल यांनी चित्रपट वादात आणण्याची भूमिका घेतली आहे. याशिवाय गंगुबाईच्या मुलानेसुध्दा याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र बॉम्बे हायकोर्टाने यावर स्थगिती दिली होती. या चित्रपटात गंगुबाईसाठी काही अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्यामुळे हि तक्रार केली होती.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून येत्या २५ फेब्रुवारीला रिलीज होणार असे जाहीर करण्यात आल्यामुळे चाहत्यांचा उत्साह प्रखर आहे पण वाद उफाळला तर निराशा होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच हा चित्रपट द माफिया क्वीन ऑफ मुंबई या कांदबरीबर आधारीत आहे. तूर्तास चित्रपटातील पहिल्या गाण्याची झिंग प्रेक्षकांना चढताना दिसतेय.