Take a fresh look at your lifestyle.

बाबुमोशाय इज बॅक..कारण जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं ! ‘आनंद’ चित्रपटाचा रिमेक होणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये असे अनेक नायक आहेत ज्यांच्या पश्चात ते त्यांच्या चित्रपटांमधून जिवंत आहेत. यालाच तर एव्हरग्रीन म्हणतात ना..! अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे, राजेश खन्ना यांचा आनंद. या चित्रपटाचे करावे तितके कौतुक कमीच वाटते. सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही या चित्रपटावर प्रेक्षकांचं तितकंच प्रेम आहे. म्हणूनच का काय..? आनंद चित्रपटाच्या रिमेक ची घोषणा करण्यात आली आहे.

होय… तुमची आवडती गाणी.. आवडते कथानक आणि अव्वल दर्जाच्या कलाकारांसह आनंद परत येतोय. बॉलिवूडचे पहिले आणि अत्यंत लोकप्रिय सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांचा उल्लेख केला जातो. यामुळे आनंद परत येणार ही बातमीच लोकांसाठी आनंदाची आहे. आनंद चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत भावनिक करणारे आहे.

 

यात मैत्रीचे नाते एका विशिष्ट पद्धतीने दर्शविले आहे. आनंदमध्ये राजेश खन्ना यांनी एका कॅन्सर पीडिताची भूमिका साकारली आहे. तर अमिताभ यांनी डॉक्टरची भूमिका साकारली आहे. यात त्यांची मैत्री प्रेक्षकांना जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देते. हे सर्व काही मुखर्जी यांनी प्रभावीपणे मांडले आहे.

यानंतर आता आनंद चित्रपटाच्या रीमेकची घोषणा करण्यात आली आहे आणि याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली आहे. १९७१ साली आलेल्या आनंद चित्रपटाचा रिमेक ही चाहत्यांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. निर्माता एन सिप्पी यांचे नातु समीर सिप्पी हे विक्रम खाखर यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत अशी माहिती मिळत आहे. येत्या काही दिवसांत आनंद चित्रपटाचे दिग्दर्शक कोण असणार..? त्यामध्ये कुणाच्या भूमिका असणार..? याविषयीची माहिती दिली जाईल. तूर्तास याबाबत कोणतीही माहिती उघड केलेली नाही.