Take a fresh look at your lifestyle.

….तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार ; रियाच्या वकिलांनी दिली माहिती

मुंबई | सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या करून दोन महिने होऊन गेले. सध्या सीबीआय, ईडी आणि एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत असून आता या प्रकरणात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर रियाला देखील कधीही अटक होऊ शकत असल्याचं बोललं जात होतं. यावर रियाचे वकिल सतिश मानशिंदे यांनी रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

रियाचे वकील सतिश मानशिंदे म्हणाले, “हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रियाच अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर रिया त्याचे सर्व प्रकारचे परिणाम भोगण्यास तयार आहे. शिवाय एनसीबीने दाखल केलेल्या खोट्या केसविरोधात निरपराध असल्याने तिने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला नाही.”

रविवारी सकाळी रियाच्या घरी एनसीबी मुंबई पोलिसांसह हजर झाली होती. एनसीबीने रियाला समन्स बजावलं. त्यानंतर तिला स्वतः किंवा पोलिसांसोबत चौकशीला येण्याचा पर्याय दिला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, रियाने त्यांना स्वतःहून चौकशीसाठी हजर होणार असल्याचं सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Comments are closed.

%d bloggers like this: