हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराटमधून प्रकाशझोतात आलेली रिंकू राजगुरू चाहत्यांची कधी लाडकी झाली समजलंच नाही. त्यात ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ज्यामुळे ती चाहत्यांसोबत विविध फोटोशूट आणि रील व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी चांगला प्रतिसाद देतात. पण यावेळी मात्र नेटकरी रिंकूवर प्रचंड चिडले आहेत. त्याच काय आहे.. आमिरच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या प्रीमिअर साठी रिंकू गेली होती. दरम्यान तिने आमिर या इ नागा चैतन्यसोबतचे फोटो शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले होते. हे नेटकऱ्यांना आवडलं नाही आणि त्यांनी रिंकूचे आगामी सिनेमे बॉयकॉट करू असं म्हटलं. यानंतर रिंकूची घाबरगुंडी उडाली आणि तिने हि पोस्ट डिलीट केली.
अभिनेता आमिर खान आणि करीना कपूरचा लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला आईच. या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याआधीपासूनच हा चित्रपट बॉयकॉट करण्याबाबत नेटकरी सक्रिय झाल्याचे आपण पहिले. सोशल मीडियावर तर #BoycottLaalSinghChaddha असा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. आमिर खानच्या चाहत्यांनी हा सिनेमा पाहिला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. यामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूचाही समावेश आहे. तिने ‘लाल सिंग चड्ढा’साठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली होती. पण नेटकऱ्यांनी तुझेही सिनेमे ब्लॉक करू म्हणताच तिने या वादातून काढता पाय घेतला.
https://www.instagram.com/p/CfBtfQyMV6i/?utm_source=ig_web_copy_link
रिंकूला ही पोस्ट अडचणीत आणू शकते हे समजताच तिने क्षणाचाही विलंब न करता हि पोस्ट दिलीत केली आहे. (यामुळे बातमीत हि पोस्ट शेअर करू शकत नाही आणि याची पुष्टीदेखील करता येणार नाही.) अभिनेत्रीने आमिर खान नागा चैतन्य या दोघांसह एक फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगदरम्यान… नक्की बघावा असा सिनेमा.
आमिर खान प्रोडक्शन आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा’.तिची हि पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, ‘आता तुझेही चित्रपट Boycott केले जातील. ‘तुला अनफॉलो करतोय’, ‘असं नको करू, नाहीतर तु देखील बॉयकॉट’, ‘सॉरी रिंकू हा सिनेमा प्रमोट करू नको. तु कुठे होतीस जेव्हा आमिर हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवत होता?’, ‘लोकं तुझे पिक्चर बघणं सोडून देतील रिंकू… विचार करून प्रमोशन कर आमिरच्या पिक्चरचं’.
Discussion about this post