Take a fresh look at your lifestyle.

RIP लॉजिक! सिंबातील खलनायक सूर्यवंशीमध्ये स्क्वॉड ऑफिसर?; युजर्सने पकडली रोहित शेट्टीची मोठी चूक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ४ नोव्हेंबर २०२१ रोजी ऐन दिवाळीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट सूर्यवंशी प्रदर्शित झाला. रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी हा चित्रपट अगदी प्रदर्शित होण्याआधीपासून खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. पण सोशल मीडियावर मात्र सूर्यवंशी चित्रपट काही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दरम्यान चित्रपटातील काही सीन्सवर युजर्सने आक्षेप घेत चित्रपट आणि रोहित शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून या युजर्सने रोहित शेट्टीची चूक दाखवून दिली आहे.

एका युजरने ट्विट करताना लिहिले आहे कि, सिंबामध्ये व्हिलनचा जो भाऊ बनला होता, तो सूर्यवंशीमध्ये अँटी टेररिझम स्क्वॉड ऑफिसर बनला आहे आणि हे बनवणार अॅवेजर्स सारखी युनिव्हर्स. यासोबतच लिहिले की, RIP लॉजिक.’ तर आणखी एका युजरने त्याच्या ट्विटच्या माध्यमातून लिहिले आहे कि, अक्कीने कॉपी केली आहे सलमान खानच्या ‘एक था टायगर’ मधील स्टंट अक्षयच्या आता रिलीज झालेल्या सूर्यवंशी चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स स्टंट यामध्ये काहीच फरक नाही.

खरतर सूर्यवंशी या चित्रपटात अँटी टेररिझम स्क्वॉड ऑफिसर हि अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका आहे. पण झालेय असे कि, रणवीर सिंगचा चित्रपट सिंबा यामध्ये व्हिलनची भूमिका साकारत असलेल्या सोनू सूदच्या भावाची भूमिका या कलाकारानेच केली होती. त्यामुळे आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, एक व्यक्ती आधी व्हिलन बनला होता आणि दुसऱ्या चित्रपटात तोच ऑफिसर का बनला? मुख्य म्हणजे ट्रोलिंगचा विषय होणार दुसरा सीन म्हणजे, अक्षय कुमार एका छप्परवरून खाली उडी मारताना दिसत आहे. हा सीन सलमान खानचा सिनेमा एक था टायगरचा कॉपी केल्याचे सांगितले जात आहे. इतकेच काय तर अनेकांनी ट्विटवर याचे पुरावे दिले आहेत.