Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | 2020 हे वर्ष बॉलीवूड साठी अत्यंत निराशाजनक गेले. याच वर्षात इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून आजही चाहते सावरले नाहीत. ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप जरी घेतला असला, तरीदेखील त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव ‘शर्माजी नमकीन’ असं आहे. हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 4 सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे याच दिवशी त्यांचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ‘शर्माजी नमकीन चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. चित्रपटासाठी ऋषी कपूर यांच्या भूमिकेचं चित्रीकरणदेखील अर्ध्यावर राहिलं होतं.

शर्माजी नमकीन’ या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरु आहे. तसंच ऋषी कपूर यांच्या भूमिकेचं चित्रीकरणदेखील अर्ध्यावर राहिलं होतं. मात्र, आता त्यांच्या जागी परेश रावल ही भूमिका साकारणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.