Take a fresh look at your lifestyle.

हर हर गंगे! महानायकाचा हृषिकेश दौरा; ब्लॉगमध्ये लिहिला गंगा पूजेचा अनुभव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थातच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी नुकतीच उत्तराखंडच्या हृषिकेशला भेट दिली. दरम्यान त्यांनी गंगा मातेची पूजा आणि आरती केली. हा अनुभव अनोखा आणि अद्भुत होता याबद्दल सांगतां बिग बी यांनी ब्लॉग लिहिला आहे. शिवाय सोशल मीडियावर या प्रसंगाचे काही टिपलेले क्षण फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत स्वामी चिदानंद सरस्वतीसुद्धा दिसून येत आहेत. स्वामी चिदानंद सरस्वती हे परमार्थ निकेतनचे अध्यक्ष आहेत. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये गंगा नदीकिनारी बसल्याचा स्वत:चा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत अनुभव लिहिला आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी लिहिलेल्या या ब्लॉगमध्ये त्यांनी गंगा पूजेदरम्यानचा अनुभव अगदी मार्मिक शब्दांत सांगितला आहे. सोबत स्वतःचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये बिग बींनी लिहिले आहे कि, .. गंगेतून देवत्व झळकते .. ती आपल्या अंतर आत्म्याला अशा प्रकारे आलिंगन देते ज्या प्रकारे इतर कोणीही देऊ शकत नाही .. आणि मानवजातीला अज्ञात रीतीने भावनांचा प्रवाह मोकळा करण्यास प्रवृत्त करते… आपण पाहतो, ऐकतो, आपल्याला माहित आहे, पण आपण करू शकत नाही.

सध्या अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमध्ये विविध भागांमध्ये सुरू आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री पुष्पा चित्रपटातील श्रीविल्ली अर्थातच अभिनेत्री रश्मिका मंदाना हि महत्वपूर्ण मुख्य भूमिका साकारते आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात नीना गुप्ता, अभिषेक खान, पावैल गुलाटी, साहील मेहता यांच्याही अन्य महत्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय बिग बींचे ब्रह्मास्त्र, रनवे 34 यांसारखे चित्रपट देखील प्रतीक्षेत आहेत.