Take a fresh look at your lifestyle.

समजलं दादा! पत्नीचे नाव दुरुस्त करणारे रितेश देशमुखचे ट्विट तुफान वायरल; युजर्सने घेतली मजा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख त्याच्या हटके अंदाजामुळे चांगलाच ओळखला जातो. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो त्यामुळे चाहत्यांची नुसती धम्माल असते. इतकेच काय तर तो त्याच्या पत्नीसह अनेकदा मजेशीर इंस्टाग्राम रिल्स तयार करताना दिसतो आणि हे रिल्स चांगलेच वायरल होतात. पण यावेळी इंस्टा रील नाही तर ट्विट वायरल होत आहे आणि ते हि बायकोच नाव दुरुस्त केल्याचं. होय..काल जिनिलियाचा वाढदिवस होता आणि तिच्या चाहत्यांनी भरपूर शुभेच्छांचा पाऊस पाडला. दरम्यान जेनेलिया म्हणणाऱ्यांसाठी रितेशने ट्विटच करून टाकले आणि हे ट्विट चांगलेच गाजले.

अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करताना लिहिले कि, माझ्या बायको चे नाव ‘जिनिलिया’ आहे . जेनेलिया नाही. अनेकजण जिनिलियाला शुभेच्छा देताना तिचे नाव चुकीचे लिहित आहेत. ते पाहून रितेशला सहन झाले नाही आणि त्याने ट्वीट करत मुद्द्याला हात घातला. ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे, जेनेलिया नाही,’ हे ट्विट तुफान वायरल झाले. त्याच्या या ट्वीटवरही युजर्सनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या. हो का? मग आता उखाणा घे, असे एका युजरने लिहिले.

जेनेलिया व जिनिलिया दोन्ही मस्त आहेत ना, असे दुस-या एका युजरने लिहिले. तर रितेशने केलेल्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तरी पण हॅपी बर्थ जेनेलियाच, अश्याच कमेंट्सना उधाण आले होते. यातील लक्षवेधी कमेंट म्हणजे, तुम्ही सांगिल्यावर समजलं दादा. तर अनेकांनी आम्ही तर वहिनीच म्हणतो असेही कमेंट केले आहे. रितेशनेदेखील आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यासोबतच्या सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करत, हॅपी बर्थ डे बायको असे त्याने लिहिले आहे. जगातील सर्वात स्पेशल व्यक्ती, असेही त्याने म्हटले आहे.