Take a fresh look at your lifestyle.

जेनेलियात गुंतलेला रितेश पुन्हा एकदा म्हणतोय, “तुझे मेरी कसम”

 

बॉलिवूड कट्टा | चंदूकाका सराफ या नामांकित सराफ व्यावसायिकांनी साधारण ३ ते ४ वर्षांपूर्वी एक जाहिरात केली होती. जाहिरातीचं शीर्षक होतं – महाराष्ट्राची सून. दूर अंतरावरुनही नजरेत भरेल असा देखणा फोटो या जाहीरातीसाठी वापरण्यात आला होता. हा फोटो होता जेनेलिया डिसुझा-देशमुखचा.

भाषिक अडचणींच्या सीमा ओलांडत वेगवेगळ्या भाषांत चित्रपट करण्याची कला अवगत असलेल्या जेनेलियाने आजपासून बरोबर १७ वर्षं आधी बॉलिवूड करियरला सुरुवात केली. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा धाकटा चिरंजीव रितेश याच्यासोबत जेनेलियाने पहिला चित्रपट केला. या दोघांनी एकत्रित केलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला आज १७ वर्षं पूर्ण झाली आहेत.

याची आठवण म्हणून रितेश आणि जेनेलियाने ट्रॅक्टरवर गाणं म्हणत आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडियो धुमाकूळ घालत असून यानिमित्ताने महाराष्ट्राची लाडकी जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: