Take a fresh look at your lifestyle.

रितेश – जिनिलियाची मराठमोळी जोडी पुन्हा रुपेरी पडदा गाजवणार; खुद्द अभिनेत्रीनेच दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा हे एक प्रसिद्ध जोडपे आहे. आजकाल हे दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहेत. रितेश आणि जिनिलिया एकमेकांवरचं प्रेम कधी लुटुपुटु भांडणं आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. त्यामुळे हे जोडपं प्रेक्षकांसाठी अतिशय प्रिय आहे. म्हणूनच दोघांनाही रुपेरी पडद्यावर बऱ्याच दिवसांपासून पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण बहुतेक आता लवकरच ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ही हटके मराठमोळी जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे असा खुद्द जिनिलियानेच खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

त्याच झालं असं कि, नुकतेच रितेश आणि जिनिलिया डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर 4’ मध्ये पाहुणे परीक्षक म्हणून दिसले. दरम्यान त्यांनी या सेटवर आपल्या लव्हस्टोरीबद्दल प्रेक्षकांना सांगितले. अगदी दोघं कसे भेटले? कसे जवळ आले? इथपासून दोघांनी त्यांच्या लग्नाचे आणि आयुष्यातील अनेको मनोरंजक किस्से सगळ्यांना सांगितले. त्यामुळे दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी आणि स्पर्धकांनी सगळ्यांनीच एन्जॉय केली. यामुळे पुन्हा रितेश- जिनिलियाला एकत्र रुपेरी पडद्यावर कधी दिसणार अशी प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, जिनिलियाला विचारण्यात आलं की, ‘प्रेक्षक तुम्हा दोघांना एकत्र पडद्यावर कधी पाहू शकतील’. यावर ती म्हणाली, ‘मला आशा आहे की हे लवकरच होईल. या वर्षाच्या अखेरीस घडू शकतं.’

 

जिनिलियाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबातील असून तिनं हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेश जिनिलिया प्रेमात पडलेच आणि १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली. तेरे नाल लव्ह हो गया चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री पाहता आता पुन्हा हे कधी एकत्र दिसणार अशी आस प्रेक्षकांना लागली आहे.