Take a fresh look at your lifestyle.

हा एक खास दिवस आहे.. Happy Birthday जिनिलिया; रितेशने शेअर केली क्युट पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे एक ट्रेंडिंग कपलं आहे. रितेश आणि जिनिलियाची स्पेशल लव्ह स्टोरी, त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल सगळं कसं नेहमीच चर्चेत असतं.

रितेश- जिनिलिया दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात आणि त्यामुळे ट्रेण्डिंगमध्ये त्यांचं नाव असत. त्यात आजचा दिवस फारच स्पेशल आहे कारण आज रितेशची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री जिनिलियाचा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून रितेशने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रितेशने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘आज सकाळी मी माझ्या हृदयाच्या धडधडीसह आणि एका सुंदर हास्यासह उठलो जे मी माझ्या चेहऱ्यावरून पुसून टाकू शकत नाही… त्यात बाहेर पाऊस पडत आहे आणि आकाशालाही माहित आहे की हा एक खास दिवस आहे. माझी जिवलग मैत्रीण, माझी जोडीदार, माझी जीवनरेखा, माझी समीक्षक आणि माझी सर्वात मोठी चीअरलीडर ….काही लोक प्रेमात वेडी होतात, काही वेड्यासारखी प्रेम करतात… मला तुझं वेड आहे @geneliad तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तू माझं कायमचं प्रेम आहेस. #HappyBirthdaygenelia

अभिनेत्री जिनिलिया एका कॅथलिक कुटुंबातील असून तिनं हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता.

पण नंतर रितेश जिनिलिया प्रेमात पडले आणि १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नगाठ बांधली. यानंतर आज त्यांचा १० वर्षांचा सुखी संसार पाहून ते एक उत्तम उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहेत.