Take a fresh look at your lifestyle.

तुझ्यासोबत असणं.. ; लग्नाच्या 10’व्या वाढदिवसानिमित्त रितेशने जिनिलियासाठी लिहिली खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा हे एक प्रसिद्ध जोडपे आहे. याचे कारण म्हणजे हे दोघे एकमेकांवर जितकं प्रेम करतात तितकं प्रेम प्रत्येक जोडप्यात असायला हवं असं प्रत्येकाला वाटत. शिवाय हे दोघे सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

शिवाय रितेश आणि जिनिलिया एकमेकांवरचं प्रेम कधी भांडून तर कधी हट्ट करून व्यक्त करताना दिसत असतात. आज या गोड कपलची १० वी ऍनिव्हर्सरी आहे. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे. इतकेच नव्हे तर रितेशने आपल्या पत्नीसाठी गोड कॅप्शनसह एक पोस्ट केली आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने आपली पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसाठी एक सुंदर कॅप्शन असलेली पोस्ट केली आहे. इतकेच नव्हे तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोदेखील शेअर केले आहेत. रितेशने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘तुझ्यासोबत असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. हास्य, अश्रू, आनंद, संघर्ष, भीती, आनंद सगळं काही एकमेकांसोबत वाटून आपण हे कित्येक मैल एकमेकांचा हात धरून चाललो आहोत. तुझ्या सोबत असल्‍याने मला वाटते की मी काहीही करू शकतो. बायको तुला लग्नाच्या १०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप प्रेम.

जिनिलिया एका कॅथलिक कुटुंबातील असून तिनं हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेश जिनिलिया प्रेमात पडले आणि १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर त्यांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नगाठ बांधली.