Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सत्या- श्रावणीच्या प्रेमातलं ‘वेड’ अनुभवा आता ओटीटीवर; कधी..? कुठे..? लगेच जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 14, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ved
0
SHARES
548
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय जोडी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया डिसोजा- देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट नादखुळा ठरला. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा मराठी रिमेक असूनही तुफान गाजला. ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच विक्रम करत इतिहास रचला आहे.

View this post on Instagram

A post shared by Desh Music (@deshmusic)

या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आणि बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. मराठी सिनेसृष्टीतील ‘सैराट’नंतर जवळपास ७५ कोटींचा आकडा पार करणारा हा दूसरा चित्रपट ठरला. त्यामुळे या चित्रपटाचं क्रेझ तुफान आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार या प्रतीक्षेत होते. तर आता हि प्रतीक्षा संपली आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

गेले कित्येक दिवस प्रेक्षक ‘वेड’ या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट बघत होते. तर आता वेटिंग खतम एंटरटेनमेंट शुरु.. कारण रितेश आणि जिनिलीयाचा ‘वेड’ आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो आहे. अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून ‘वेड’च्या ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ पासून ‘वेड’ हा अत्यंत गाजलेला मराठी चित्रपट ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. शिवाय हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहता येणार असल्याने इतर भाषिक प्रेक्षकांनाही याचा आनंद घेता येईल.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश- जिनिलीयाचा ‘वेड’ हा चित्रपट त्याच्या टिझर, ट्रेलरपासूनही प्रचंड चर्चेत राहिला. यानंतर जेव्हा थिएटर रिलीज झालं तेव्हा मात्र प्रत्येक शोसाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पहायला मिळाली. हा चित्रपट साऊथ स्टार नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभू यांच्या ‘मजिली’ चित्रपटाचा अधिकृत मराठी रिमेक आहे. अनेकांनी ‘मजिली’ हा चित्रपट पाहूनही ‘वेड’वर मात्र वेड्यासारखं प्रेम केलं. केवळ कथानक नव्हे तर कलाकारांचा अभिनय, गाणी सगळं कस अप टू द मार्क. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

Tags: Disney Plus HotstarGenelia D'souza DeshmukhInstagram PostMarathi MovieOTT ReleaseRiteish deshmukhVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group