मराठमोळे रितेश आणि जेनेलियाच्या मुलाच्या बड्डे पार्टीला ‘या’ बाॅलिवुड स्ट्रार्सची हजेरी
मुंबई | रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांचा मुलगा रायन यांचा वाढदिवस २३ नोव्हेंबरला मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या मुलांनी पार्टीत हजेरी लावली. या स्टार्समध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, मीरा राजपूत, तुषार कपूर आणि राणी मुखर्जी होते. रितेश देशमुख आणि जेनेलिया पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले. या दरम्यान रितेश टी शर्ट आणि जीन्ससह कॅज्युअल लूकमध्ये दिसला. तर जेनेलियाने पांढर्या टी-शर्टसह हलक्या हिरव्या रंगाचा स्कर्ट चढविला होता.

अभिषेक आणि ऐश्वर्या मुलगी आराध्यासमवेत पार्टीत सहभागी झाले होते. अभिषेकने व्हाइट हूडीसह जीन्स घातली होती. त्याचवेळी ऐश्वर्याने ब्लॅक लाँग टॉप घातला होता. आराध्या देखील कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाच्या टॉपसह जीन्स घातली होती.

राणी मुखर्जी आपली मुलगी आदिरासमवेत पार्टीत सामील झाल्या. जरी राणीने आदिराला कॅमेर्यापासून दूर ठेवले आहे, परंतु यावेळी पार्टीमध्ये जाताना फोटोग्राफरने त्यांना पकडले. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत मुलगीसमवेत पार्टीत आली होती. यावेळी मीराने ब्लॅक टॉपसह जीन्स घातली होती.