Take a fresh look at your lifestyle.

आता देव देव कश्यासाठी? मंदिरात गोर गरिबांना मदत करताना दिसली रिया चक्रवर्ती; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या निधनासाठी बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाच जबाबदार धरले गेले होते. इतकेच नव्हे तर यासाठी रियाला जेलदेखील पाहावे लागले होते. कधीही चर्चेत नसणारी रिया सुशांत च्या निधनानंतर मात्र चांगलीच चर्चेत आली. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती पण सुशांतच्या निधनानंतर तिच्या ग्लॅमरस लाईफस्टाइलची पूर्ती वाट लागली. यानंतर तिला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केले गेले. आता काहीशी स्थिरावलेली रिया सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसते. नुकतीच ती एका मंदिरात गोरगरिबांना दान करताना दिसलेली. यानंतर मात्र ट्रोलर्सने तिची काही पाठ सोडली नाही.

आता रिया तिची इमेज पूर्ववत करतेय असे काहीसे लोकांना वाटू लागले आहे. लॉकडाऊन काळातही तिने गरजुंना मदत करणार म्हटले होते. त्यावेळी तिच्यावर टीका झाल्या. यानंतर आता रिया जे काही करेल त्यावर सुशांतचे चाहते टीका करतातच. आपला संताप व्यक्त करताना ते सोशल मीडियाचा वापर करतात. नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात अगदी कुर्ता पायजामा ड्रेसमध्ये ती मंदिरात पुजा करताना दिसतेय आणि दुसरीकडे गरिबांना मदतही करताना दिसतेय. रियाचे बदलेले रुप पाहून चाहत्यांनी पुन्हा तिला ट्रोल केले आहे.

रियाचे हे फोटो पाहून युजर्स संतप्त प्रतिक्रीया देत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त करत एकाने म्हटलंय की, देवपुजा केल्याने तुझी पापं काही धुतली जाणार नाहीत. तर दुसऱ्या एकाने म्हटले कि, आता देव देव कश्यासाठी? इतकेच काय तर अनेकांनी तिला नौटंकी करते, दिखावा करते असे म्हणत टीकेच्या धारेवर धरले आहे. तर काहींनी म्हटलंय प्रसिद्धीसाठी फोटोग्राफरला बरोबर घेऊन गेली होतीस का असे कमेंट्स करताना दिसत आहे. हळूहळू सर्वकाही विसरत रिया पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतेय . पण चाहत्यांनी काही नाराजीचा सूर सोडलेला नाही हेच खरं!