Take a fresh look at your lifestyle.

राऊत शुभविवाह जोगळेकर! नाचूया तर्राट.. हळदीला…; रोहित- जुईलीच्या हळदीचे फोटो झाले व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीनंतर आता मराठी सिने इंडस्ट्रीत लगीन घाई दिसून येतेय. मराठी संगीत विश्वातील कुलेस्ट आणि बिंधास्त कपल म्हणून नेहमी चर्चेत असलेले रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर येत्या २३ जानेवारी २०२२ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या राऊत आणि जोगळेकरांच्या घरी लगीनघाई पहायला मिळत आहे. नुकताच दोघांच्या हळदीचा आणि ग्रहमख कार्यक्रम पार पडला आहे.

सध्या डिजिटल युग आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हे जोडपं आधुनिक जोडपं आहे त्यामुळे सगळं कसं डिजिटल. अगदी लग्नपत्रिकेपासून ते प्रत्येक सोहळ्यापर्यंत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा एकदम जोरात आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या हळदी समारंभाचे फोटोसुद्धा चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर अगदी रोहित आणि जुईली दोघेही नेहमीच सक्रिय दिसतात. आता त्यांच्याच लग्नाची घाई चालू आहे आणि त्यांच्या चाहत्यांना कळणार नाही असे कसे चालेल नाही का? म्हणूनच त्या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्रामचा पुरेपूर वापर केला आहे. दोघांच्याही इन्स्टा पेजवर त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये रोहित आणि जुईली आनंदी दिसतच आहेत. पण त्यांचे कुटुंबीय त्यांच्यापेक्षाही जास्त आनंदी दिसत आहेत.

रोहित आणि जुईली हे रविवारी २३ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील ढेपे वाडा येथे लग्नगाठ बांधणार आहेत. यापूर्वी मराठी विश्वातील क्यूट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने पुण्यातील ढेपे वाडा येथे पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. तर लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने देखील तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम याच वाड्यात साजरा केला होता.

रोहित आणि जुईलीची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. यानंतर मैत्री, डेटिंग, प्रेम आणि हा प्रवास आता लग्नापर्यंत येऊन पोहोचला आहे.

सोशल मीडियावर दोघांनाही त्यांची आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जात आहेत.