Take a fresh look at your lifestyle.

रोहितचा गोलमाल ५ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला ?

0

हॅलो बॉलीवूड । अक्षय कुमार यांच्यासमवेत सूर्यवंशी हा चित्रपट तयार झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या हिट फ्रेंचायसी गोलमालवर काम करणार आहेत. रोहित शेट्टी अजय देवगन यांच्यासमवेत गोलमाल 5 हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे , की गोलमाल अगेन हा एक भयानक विनोदी चित्रपट होता . आणि आता निर्मात्यांनी त्यातील पाचवा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा चित्रपट एका नव्या आणि रंजक कथेवर आधारित असेल. पुढील वर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. अजयने सांगितलं कि , ‘रोहित आणि मी गोलमालचा पुढचा चित्रपट बनवणार आहोत . कारण मी म्हटल्याप्रमाणे ही मजेदार आहे आणि माझी आवडती मालिका आहे.’

अजय देवगण व्यतिरिक्त, अरशद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अन्य कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. परंतु यावेळी हे विशेष म्हणजे या पार्ट मध्ये नवीन पात्रांची एंट्रीही होऊ शकते.

या चित्रपटाच्या फीमेल लीडविषयी बोलताना बातमी अशी आहे की, या चित्रपटाची नायिका पुढच्या वर्षीच सापडेल. रोहित शेट्टीला सिम्बा आणि सूर्यवंशी बनल्यानंतर कॉप ड्रामा चित्रपटातून ब्रेक घ्यायचा होता. आणि म्हणूनच तो गोलमालमध्ये परतला आहे. सध्या रोहित सूर्यवंशीच्या चित्रीकरणात आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत असून 2020 मध्ये प्रदर्शित होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.