Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच डिजिटल विश्वात करणार पदार्पण

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी हे त्यांच्या अॅक्शन सीन्ससाठी बॉलिवूडमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. रोहित शेट्टीनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता रोहित अॅक्शन सीनचा भरणा असलेली एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शेट्टी आठ भागांची एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज करणार आहे. ही सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत आहे. या सीरिजचे नाव काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या रोहित त्याचा आगामी चित्रपट ‘सर्कस’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळात रोहित शेट्टीने या सीरिजची स्क्रिप्ट तयार केली असल्याचे म्हटले जात आहे.

‘सर्कस’ हा चित्रपट ८०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘अंगूर’ चित्रपटाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. चित्रपटात रणवीरसोबत वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.