Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यात अश्लीलतेला थारा देणार नाही..; RPI’ च्या पदाधिकाऱ्यांनी फाडले ‘एक नंबर सुपर’चे पोस्टर्स

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनचा ‘एक नंबर सुपर’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एक नंबर…सुपर’ या मराठी चित्रपटात प्रथमेश परब सोबत एलेनाचा धमाल डान्स आहे. हा चित्रपट सातारा येथे प्रदर्शित करण्यात आला असता आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांकडून या चित्रपटाचे लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा भूमीत अशा अश्लीलतेच्या प्रदर्शनाला आम्ही थारा देणार नाही, असा इशारा यावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यानी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

आज आरपीआयच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने सातारा शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यानी ‘एक नंबर…सुपर’ या मराठी चित्रपटाचे शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर फाडून टाकले. तसेच चित्रपटाच्या फ्लेक्सवर अशा पद्धतीने अर्धनग्न तरुणींचे फोटो प्रदर्शित होत असल्याने राज्य महिला आयोग याचे गांभीर्याने घेणार का? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

यावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यानी चित्रपटाच्या पोस्टरबाबत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा भूमीत अशा प्रकारे चित्रपटाच्या पोस्टरद्वारे अश्लीलतेचे प्रदर्शन केले जात आहे. अशा प्रकाराला आम्ही थारा देणार नाही. फ्लेक्सवर अशा पद्धतीने अर्धनग्न तरुणींचे फोटो प्रदर्शित होत आहेत. या विरोधात राज्य महिला आयोग गांभीर्याने दखल घेणार आहे का? तसेच कारवाई करणार का? असा प्रश्न यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.