Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या शूटिंगला आरपीआय संरक्षण देणार – रामदास आठवले

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोलच्या दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सरकारवर टीका केली होती. मात्र आज पेट्रोल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली असताना हे सेलिब्रिटी मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांचे चित्रपटांचे शूटींग व चित्रपट महाराष्ट्रात बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. नाना पटोले यांच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग बंद पाडू अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही विरोध करतो. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या शूटिंगला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

तसंच, ‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात इंधन दरवाढीवर ट्वीटकरुन निषेध केला होता. याचा अर्थ त्यांनी आज इंधन दरवाढीवर पण ट्वीट करावं असा होत नाही. नाना पटोले यांनी अशी धमकी देणं चांगली गोष्ट नाही,’ असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.